घरमनोरंजनम्हणून दीपिकाने मागितली आपल्या चाहत्यांची माफी...

म्हणून दीपिकाने मागितली आपल्या चाहत्यांची माफी…

Subscribe

दीपिकाच्या एका फॅन पेजने तिला पुरस्कार मिळाला नाही म्हणून नाराजी व्यक्त केली होती. यावर दीपिकाने प्रतिक्रीया देत आपल्या चाहत्यांची माफी मागितली.

नुकताच पार पडलेल्या फिल्म फेअर पुरस्कार २०१९ सोहळ्यात आलिया भट्टला ‘राझी’ या चित्रपटाकरिता सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या सर्वात्कृष्ट अभिनेत्रीच्या स्पर्धेत पद्मावतसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणचा देखील समावेश होता. परंतु, यंदाच्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्टने पटकावला. यावेळी सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नाही म्हणून दीपिकाने आपल्या चाहत्यांची माफी मागत पुढे अजून मेहनत घेण्याचे वचन दिले आहे. दीपिकाच्या एका फॅन पेजने तिला पुरस्कार मिळाला नाही म्हणून नाराजी व्यक्त केली होती. यावर दीपिकाने प्रतिक्रीया देत आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची माफी मागितली.

- Advertisement -

 ‘छपाक’ मधून चाहत्यांच्या भेटीस

जानेवारी २०१८ मध्ये संजय लीली भन्साळीच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात दीपिकाने राणी पद्मिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु, चित्रपट समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.’पद्मावत’नंतर दीपिका कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. परंतु लवकरच दीपिका तिच्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दीपिकाने मेघना गुलज़ारच्या ‘छपाक’ या चित्रपटाच्या शुटिंगची सुरूवात केली आहे. या चित्रपटातील तिचा पहिला लूक सोमवारी रिलीज झाला. या चित्रपटात ती अॅसिड हल्ल्यातील पिडीत तरूणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -