घरमनोरंजनदीपिका पदुकोणची कबुली; म्हणाली 'त्या' जाहिराती करण्याचा होतोय पश्चाताप

दीपिका पदुकोणची कबुली; म्हणाली ‘त्या’ जाहिराती करण्याचा होतोय पश्चाताप

Subscribe

अमेरिकेत कृष्णवर्णिय जॉर्ज फ्लॉयड याच्या हत्येनंतर जगभरातून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान, बॉलीवूडमधील सेलिब्रिटींनीही फेअरनेस क्रिमच्या जाहिराती करणाऱ्या कलाकारांचा मुद्दा उपस्थित करून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी आता बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आपली चूक मान्य करत फेअरनेस क्रिम आणि कोला ब्रँडच्या जाहिराती करण्याचा पश्चाताप होत असल्याची कबुली दिली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अभय देओल याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत बॉलीवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला होता. त्याने जे जे कलाकार फेअरनेस क्रिमची जाहिरात करतात त्यांची नावे देत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्री कुबरा हिने त्याला प्रतिसाद देत आपण यापुढे त्या जाहिराती करणार नाही, असा रिप्लाय दिला होता.

- Advertisement -

काय म्हणाला होता अभय देओल 

अभय देओल याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंबंधीचे पोस्ट शेअर करत एक प्रश्न वाचकांना विचारला होता. तुम्हाला वाटते का की भारतीय कलाकार फेअरसेन क्रिमचा प्रचार करणे थांबवतील, असे त्याने पोस्टमध्ये नमूद केले होते. दरम्यान, त्यांनी ग्राफिक्सच्या माध्यमातून वापरण्यात येणाऱ्या फेअरनेस क्रिमच्या मागणीचे आलेखदेखील दाखवला. भारतात काही वर्षांपूर्वी फेअरनेस क्रिम आली. आधी फेअरनेस क्रिम आणि आता स्किन लाईटनिंग, व्हाईटनिंगसोबत ब्राईटनिंग क्रिमदेखील बाजारात आली. कित्येक ब्रँड्स हे फेअरनेस क्रिमच्या प्रकारात येऊ इच्छित नसल्याने त्यांना आता एचडी ग्लो, व्हाईट ब्युटी, व्हाईट ग्लो आणि फाईन फेअरनेस असे त्यांच्या प्रसाधनांना नावे दिली आहेत. बदलत्या काळानुसार आता या कंपन्यांनी पुरुषांसाठीही असे फेअरनेस क्रिम बाजारात आणले आहेत, हे मुद्दे अभय देओल याने मांडले. त्यानंतर कलाकारांकडून अशा जाहिरातींवरील प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली.

हेही वाचा –

औरंगाबादमधील बहिण – भावाच्या हत्येचा उलगडा; चुलत भावानेच केली हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -