घरमनोरंजनमधुरिमा रॉयमुळे झालं Varun Sood - Divya Agarwal चं ब्रेकअप? अभिनेत्रीने दिलं...

मधुरिमा रॉयमुळे झालं Varun Sood – Divya Agarwal चं ब्रेकअप? अभिनेत्रीने दिलं उत्तर

Subscribe

हिंदी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय कपल म्हणून अभिनेत्री दिव्या अग्रवाल आणि वरून सूद यांचे नाव घेतला जात होतं. मात्र आता दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आल आहे. चाहत्यांमधून दिव्या आणि वरूणच्या ब्रेकअप मागे नेमकं कारण काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. काही युजर्सनी या ब्रेकअपसाठी वरूणला दोषी ठरवले आहे. परंतु दिव्याने वरूणसोबत ब्रेअकप झाल्याची घोषणा करत त्यामागचे स्पष्टीकरण दिले आहे. दिव्याने इन्स्टाग्राम पोस्ट करत दोघेही यापुढे चांगले मित्र राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र या बातमीनंतर चाहत्यांमध्ये उलट सुलट चर्चा रंगत आहेत. वरूण सूदने दिव्याची फसवणूक केल्याने दोघांचं ब्रेकअप झाल्याचे चाहत्यांचे मत आहे.

मात्र वरूणवर आरोप करणाऱ्यांना दिव्याने फटकारले आहे. दिव्याने ट्विटवर वरूणचा बचाव करत म्हटले की, खबरदार वरूणच्या चारित्र्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केलात तर.. आमचं ब्रेअकप कोणाच्या चारित्र्यावरील संशयामुळे झाले नाही. तो एक प्रामाणिक व्यक्ती आहे. आम्ही दोघांनी वेगळं होणं हा माझा स्वत:चा निर्णय आहे. त्यामुळे कोणाबद्दल चुकीचे लिहिण्याचा कोणालाही अधिकार नाही. आयुष्यात असे निर्णय घेण्यासाठी खूप ताकद लागते. माझ्यासाठी असा निर्णय घेणं सोप्पं नव्हतं.

- Advertisement -

मात्र त्यांचं हे रिलेशनशीप तुटण्यामागे मधुरिमा रॉय कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. एका युजर्सने ट्विटरवर वरूण सूदचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो मधुरिमा रॉयने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर पोस्ट केलाय.

- Advertisement -

या व्हायरल व्हिडीओवरून चाहत्यांनी अंदाज बांधला की, वरूण सूदचे मधुरिमा रॉयसोबत अफेअर सुरु असल्याने दिव्याने त्याच्यासोबत ब्रेकअप केले. यावर दिव्याने देखील उत्तर दिले.

तसेच दिव्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मधुरिमाला एक पोस्ट टॅग करत लिहिले की, तु स्वीटहार्ट आहेस. काळजी करू नको, लव्ह यू. काही झालं तरी वरूण आणि तू माझ्यासाठी नेहमीच प्रिय असणार आहात. त्यामुळे दिव्याने वरूणसोबत वेगळे होण्याचा निर्णय घेत आता एकटं राहण्याचा ठरवलं आहे. तसेच यात काही चुकीचे नसल्याचेही तिने म्हटलेय. त्यामुळे काही चाहत्यांकडूनही दोघांच्या निर्णयाचे सन्मान करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान वरूण आणि दिव्या अग्रवाल यांची पहिली भेट एस ऑफ स्पेस या रिअॅलिटी शोमध्ये झाली होती. दोघांनी या शोमध्ये एकत्र एन्ट्री घेतली होती. यानंतर वरूनने दिव्याला सर्वांसमोर प्रपोज केले. वरूणच्या आधी दिव्या अग्रवाल प्रियांक शर्माला डेट करत होती.

वास्तविक वरूण सूदचे रिलेशनशीप हिस्ट्री फार चांगली नाही. वरूणची एक्स गर्लफ्रेंड बेनफ्शा सूनावालानेनीही त्याच्यावर फसवणूकीचा आरोप केला. त्यानंतर बेनफ्शाचे दिव्याचा एक्स बॉयफ्रेंड प्रियांक शर्मा डेट करतेय. त्यावेळी वरूणने एडमिट केले होते की, प्रियांकमुळे माझे बेनफ्शासोबतचे नाते बिघडले. यामुळे आता वरूणने दिव्याला चीट केल्याने दोघांच नातं खराब झाल्याचे म्हटले जातेय. दिव्या अग्रवाल आणि वरूण सूद गेल्या 4 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -