घरमनोरंजनआयुषमानने केला 'बधाई हो' चा खुलासा

आयुषमानने केला ‘बधाई हो’ चा खुलासा

Subscribe

अभिनेता आयुषमान खुराना यांच्या बधाई हो या आमागी चित्रपटाचे ट्रेलर सध्या सोशल मीडियावर लाँच झाले असून याबाबत स्वतः आयुषमानने ट्विट केले आहे.

‘मेरे मम्मी के बेबी शावर में जरूर आना’, ऐकायलाच थोड विचित्र वाटतयं, हो ना. पण हे म्हणतोय अभिनेता आयुषमान खुराना. त्याचा आगामी चित्रपट ‘बधाई हो’ चा ट्रेलर लाँच झाला असून कौटुंबिक विनोदी असलेल्या चित्रपटात आयुषमान आणि सन्या मल्होत्राची जोडी पाहायला मिळणार आहे. यापूर्वी सन्याने ‘दंगल’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तर येत्या काही दिवसांमध्ये तिचा विशाल भारद्वाज निर्मित ‘पटाखा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर बऱ्याच दिवसांनी अभिनेत्री नीना गुप्ता मुख्य आणि वेगळ्या भूमिकेत दिसत आहे.

सोशल मीडियावर चित्रपटाची धूम  

‘देख लो सब लोक, जाननी थी ना खुष खबरी’, असे म्हणत आयुषमान खुराना याने त्याच्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. तसेच ‘बधाई हो’ चा ट्रेलर पाहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुषमान खुरानाच्या ‘बधाई हो’ चित्रपटाचे पोस्टर चर्चेत होते. चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार याचा अंदाज बांधला जात होता. आता याचा खुलासा झाला असून सिनेमात आयुषमानच्या आईची भूमिका साकारणारी नीना गुप्ता गरोदर असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे कुटुंब आणि त्यासंबंधीत वारंवार भेटणारे लोकं कशा पद्धतीने व्यक्त होतात, हे मजेशीररित्या दाखवण्यात आले आहे.

आयुषमानच्या हटके चित्रपटांची यादी 

  • विकी डोनर (२०१२)
  • दम लगाके हैश्शा (२०१५)
  • मेरी प्यारी बिंदू (२०१७)
  • बरेली की बर्फी (२०१७)
  • शुभ मंगल सावधान (२०१७)
  • अन्धाधुंद (२०१८)
  • बधाई हो (१९ ऑक्टोबर २०१८)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -