घरमनोरंजनFilmfare OTT Awards 2020: 'पाताल लोक', 'पंचायत' सर्वाधिक पुरस्काराचे मानकरी

Filmfare OTT Awards 2020: ‘पाताल लोक’, ‘पंचायत’ सर्वाधिक पुरस्काराचे मानकरी

Subscribe

यंदाच्या वर्षी वेबसिरीजचा बोलबाला पाहायला मिळाल्याने फिल्मफेअर ने ओटीटी कॉन्टेंटसाठी फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सुरू

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दरम्यान कोरोनाचा फैलाव असल्याने गेले ८ महिने नाट्यगृहांसह चित्रपटगृह देखील बंद ठेवण्यात आले होते. यावेळी प्रेक्षक डिजिटल प्लॅटफॉर्म, ओटीटीकडे अधिक वळले. तर हिंदी, मराठी निर्मात्यांनी देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेबसिरीज प्रदर्शित केलेत. यामुळे कोरोनादरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरंजनाचे उत्तम साधन बनले. थिएटर बंद असल्याने यंदाच्या वर्षी वेबसिरीजचा बोलबाला पाहायला मिळाल्याने फिल्मफेअर ने ओटीटी कॉन्टेंटसाठी फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सुरू केले आहेत.

पहिल्यांदाच पार पडलेल्या फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारांत अनुष्का शर्माची पाताल लोक ही सर्वेत्कृष्ट वेबसिरीज ठरली आहे. पाताल लोक आणि द फॅमिली मॅनने प्रत्येकी ५ पुरस्कार तर अॅमेझॉन प्राईमच्या पंचायत या वेबसिरिजने ४ पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. पहिल्यांदाच होणाऱ्या फिल्म फेअर ओटीटी पुरस्कारात कोणत्या वेबसिरीजचा बोलबाला असेल, या पुरस्कारात कोण बाजी मारणार याकडे सर्वच नेटिझन्सचे लक्ष होते. दरम्यान या ओटीटी कॉन्टेंटसाठी फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारात कॉमेडी, ड्रामा आणि क्रिटिक्स असा विभागात वेब सिरीजची निवड करण्यात आली.

- Advertisement -

पाताल लोकसाठी जयदीप अहलावतने सर्वेत्कृष्ट अभिनेता तर अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय यांनी सर्वेत्पृष्ट दिग्दर्शनाच्या पुरस्कार पटकावला. आर्या या वेबसिरीजद्वारे डिजिटल विश्वात पदार्पण करणारी सुश्मिता सेन सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. द फॅमिली मॅन ही क्रिटिक्स विभागात सर्वेत्कृष्ट सिरिज ठरली आहे. याशिवाय या सिरिजने सर्वेत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वेत्कृष्ट अभिनेता, सर्वेत्कृष्ट अभिनेत्री या विभागांतही क्रिटिक्स पुरस्कारांवर नाव कोरले आहे. वेब ओरिजनल चित्रपटांमध्ये रात अकेली है चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दिकी सर्वेत्कृष्ट अभिनेता तर बुलबुलसाठी तृप्ती डिमरी सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. तर जाणून घेऊया कोणत्या वेबसिरीजला कोणता पुरस्कार मिळाला.

 

  • Best Series: Paatal Lok
  • Best Director (Series): Avinash Arun and Prosit Roy (Paatal Lok)
  • Best Series (Critics): The Family Man
  • Best Director (Critics): Krishna DK and Raj Nidimoru (The Family Man)
  • Best Actor in a Drama Series (Male): Jaideep Ahlawat (Paatal Lok)
  • Best Actor in a Drama Series (Female): Sushmita Sen (Aarya)
  • Best Actor in a Drama Series (Critics): Manoj Bajpayee (The Family Man)
  • Best Actress in a Drama Series (Critics): Priyamani (The Family Man)
  • Best Actor in a Comedy Series (Male): Jitendra Kumar (Panchayat)
  • Best Actor in a Comedy Series (Female): Mithila Palkar (Little Things Season 3)
  • Best Actor in a Comedy Series (Critics): Dhruv Sehgal (Little Things Season 3)
  • Best Actress in a Comedy Series (Critics): Sumukhi Suresh (Pushpavali Season 2)
  • Best Actor in A Supporting Role in a Drama Series (Male): Amit Sadh (Breathe: Into The Shadows)
  • Best Actor in A Supporting Role in a Drama Series (Female): Divya Dutta (Special OPS)
  • Best Actor in A Supporting Role in a Comedy Series (Male): Raghubir Yadav (Panchayat)
  • Best Actor in A Supporting Role in a Comedy Series (Female): Neena Gupta (Panchayat)
  • Best Non-Fiction Original (Series/Special): Times of Music
  • Best Comedy (Series/Specials): Panchayat
  • Best Film (Web Original): Raat Akeli Hai
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -