घरमनोरंजन‘तुझं माझं अरेंज मैरिज’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

‘तुझं माझं अरेंज मैरिज’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

Subscribe

'तुझं माझं अरेंज मैरिज' या आगामी मराठी चित्रपटाचा फस्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.

अमित ललित तिळवणकर निर्मित आगामी चित्रपट ‘तुझं माझं अरेंज मैरिज’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक ७ मार्च २०२१ रोजी मुंबईतील जुहूमधील पिव्हीआर येथे नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी बोलताना चित्रपटाचे निर्माते अमित ललित तिळवणकर म्हणाले, “तुझं माझं अरेंज मैरिज’ या चित्रपटाचा हेतू हा नवीन पिढीला एक संदेश देण्याचा आहे. जेव्हा दोन कुटुंबे लग्न जुळविण्यासाठी एकत्र येतात तेव्हा तो प्रसंग जगातील सर्वात सुखद गोष्टींपैकी एक असतो. मुलाने किंवा मुलीने त्या अख्ख्या कुटुंबाविरोधात जाणे किती बरोबर असते? तुमचे पालक किंवा कुटुंबीय तुमच्यासाठी नेहमीच योग्य असा निर्णय घेतात. ‘तुझं माझं अरेंज मैरिज’ हा असा चित्रपट आहे कि जो सर्व कुटुंबाने एकत्र बसून पाहायला हवा. प्रेक्षक आम्हाला भरभरून प्रतिसाद देतील, असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे.” या चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजित चव्हाण, सुनील गोडबोले, अभिलाषा पाटील, बिपीन सुर्वे, प्रीतम कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा फ्लॅशबॅकमध्ये सुरु होते आणि पाच वर्षे मागे जाते. महाविद्यालयात असताना स्वरूप हा गौरीच्या प्रेमात असतो. पण स्वरूपचे लग्न त्याचे कुटुंबीय मीराबरोबर ठरवतात. दरम्यान गौरी परत येते आणि स्वरूपला त्यांच्या प्रेमाची आठवण करून देते. स्वरूप आता कोणाशी लग्न करतो मिराशी की गौरीशी? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. या चित्रपटात प्रेमातून केलेले लग्न आणि जमवून केलेले लग्न यातील फरक अधोरेखित केला गेला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजय शिरोदे यांनी केले असून कथा मयूर परदेशी यांची आहे. तसेच अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, जसराज जोशी आणि नागेश मोरवेकर यांनी यातील गाणी गायली आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून तो यंदाच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

- Advertisement -

हे वाचा-प्रियांकाशी लग्न करण्याचे निकने दिले मजेशीर कारण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -