घरमनोरंजनटेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच 'गाथा नवनाथांची'

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘गाथा नवनाथांची’

Subscribe

पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे

महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर मालिका झाली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका २१ जूनपासून सोम.-शनि., संध्या. ६:३० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. या मालिकेत मच्छिन्द्रनाथांच्या भूमिकेत जयेश शेवाळकर दिसणार आहे, तर अनिरुद्ध जोशी गोरक्षनाथांची भूमिका साकारणार आहे. नकुल घाणेकर आणि शंतनू गंगणे हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

- Advertisement -

ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे.२१ जूनपासून सोम.-शनि., संध्या. ६:३० वा. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.


हे हि वाचा – Devmanus: देविसिंग लटकणार फासावर?, मालिकेत नव्या पात्राची एंट्री
Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -