घरताज्या घडामोडी'गंदी बात' फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला पुन्हा ह्रदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर

‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला पुन्हा ह्रदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर

Subscribe

'बहने' या मालिकेत ती मुख्य भुमिकेत दिसली होती

‘गंदी बात’ (Gandhi Baat) फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला ( Gehna Vashisht)  ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. (‘Gandhi Baat’ fame actress Gehna Vashisht Hospitalised due to heart attack)  २२ नोव्हेंबर २०१९मध्ये एका वेबसीरिजचे शुटींग करत असताना वशिष्ठला ह्रदयविकाराचा पहिला झटका आला होता. त्यानंतर ती अनेक दिवस रुग्णालयात होती. अनेक दिवसांच्या उपचारानंतर वशिष्ठला घरी पाठवण्यात आले. त्यानंतर तिने कामाला सुरुवात केली. मात्र तिला शनिवारी तिला पुन्हा अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. याचदरम्यान गहनावर पॉर्न व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात तिला मडगाव पोलिसांनी अटक देखील केली होती. गेल्या आठवड्यात तिची जामिनीवर सुटका करण्यात आली आणि याच दरम्यान तिला पुन्हा एकदा ह्रदयविकाराचा झटका आला.

- Advertisement -

गहना इंडस्ट्रीत नव्याने येऊ पाहणाऱ्या स्ट्रगलिंग अभिनेत्रींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पॉर्न व्हिडिओ शूट करुन घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गहना एक शूटच्या बदल्यात २० हजार रुपये देत असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे.

- Advertisement -

वंदना तिवारी असे गहनाचे खरे नाव आहे. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी तिने नावात बदल करुन गहना वशिष्ठ केले. गहनाने आजवर अनेक जाहिरातींसाठी काम केले. ‘बहने’ या मालिकेत ती मुख्य भुमिकेत दिसली होती. मात्र एकता कपूरच्या गंदी बात या वेबसीरिजमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्याचप्रमाणे ‘फिल्मी दुनिया’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मालिका, बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच गहनाने अनेक तेलगू सिनेमातही काम केले आहे.


हेही वाचा – मंदिरा बेदीने सोशल मीडियावर व्यक्त केलं दु:ख, पती राजच्या निधनानंतर प्रथमच केला फोटो शेअर

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -