घरमनोरंजन'मास्टरशेफ इंडिया' मधील 'ठेचा क्वीन' सुवर्णा बागुल यांचा होम शेफ ते मास्टर...

‘मास्टरशेफ इंडिया’ मधील ‘ठेचा क्वीन’ सुवर्णा बागुल यांचा होम शेफ ते मास्टर शेफ प्रवास

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील बहुचर्चित “मास्टरशेफ इंडिया ” हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. “मास्टरशेफ इंडिया ” या शोमध्ये सध्या टॉप 15 होम कुक्सची निवड करण्यात आली असून या सत्राच्या विजेतेपदासाठी त्यांच्यात स्पर्धा रंगणार आहे. मुंबईच्या सुवर्णा विजय बागुल या टॉप 15 स्पर्धकांपैकी एक आहेत. सुवर्णा या शोमध्ये महाराष्ट्रातील विविध पाककलेचे प्रतिनिधित्व करत आहेत.

‘ठेचा क्वीन’चा होम शेफ ते मास्टर शेफ प्रवास

सुवर्णा कार्यक्रमात विविध महाराष्ट्रीयन खाधपदार्थ दाखवण्यासाठी आणि मास्टरशेफ इंडियामध्ये येण्याचे स्वप्र पूर्ण करण्यासाठी आल्या आहेत. या शोचे परीक्षक रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खत्रा आहेत. ते सुवर्णाला या शोमधली “ठेचा क्वीन” असे म्हणतात. सुरुवातीला या शोसाठी देशरभरातून टॉप 36 होमकुक्स आले होते, ज्यामध्ये सुवर्णाच्या “महाथाळी” ची निवड झाली. या थाळीत सर्व महाराष्ट्रीयन फ्लेवर्स होते.

- Advertisement -

एका मुलाखतीत सुवर्णा यांनी सांगितले होते की, त्यांना आयुष्यात काहीतरी केले पाहिजे असं नेहमी वाटायचं. त्याप्रमाणे त्यांना “मास्टरशेफ” साठी संधी चालून आली. ज्या संधीची त्या वाट बघत होत्या ती संधी स्वत: होऊन त्यांच्याकडे चालत आली. तेव्हापासून थोडं- थोडं करत त्यांनी घरी सराव करण्यास सुरुवात केली. तसेच विविध प्रकारचे खादय पदार्थ बनविण्याचे कार्यक्रम बघायला सुरुवात केली. मात्र, यासगळ्यात सिंजन 2 ते सिंजन 6 निघुन गेले त्यादरम्याण एक प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र त्यात यश मिळाले नाही. तरीही संयम ठेवून पुढे–पुढे जात राहिल्या आणि शेवटी ‘मास्टरशेफ इंडिया 7’ सिजनटची ऑडिशन घोषित झाली. त्यांनी ऑडिशनची पुर्ण तयारी केली. त्यांना त्यांचे लक्ष मिळाले आणि सिलेक्शन देखील झाले.


हेही वाचा : 

‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ ही नवी सीरिज मुघलांच्या वारसाहक्काच्या कथांवर आधारित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -