घरमनोरंजनमी सारा-इब्राहिमची आई होऊच शकत - करीना कपूर

मी सारा-इब्राहिमची आई होऊच शकत – करीना कपूर

Subscribe

'सारा किंवा अब्राहिमला कधी माझा आधार हवा असल्यास किंवा कोणत्या कामात सल्ला हवा असल्यास, मी नेहमीच त्यांच्यासाठी हजर असेन,' असंही करिना यावेळी म्हणाली.

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती साराच्या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटाची. सारा अली खानच्या केदारनाथ चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला असून, साराच्या बॉलीवूड डेब्युसाठी लोक उत्सुक झाले आहेत. सारा स्वत:ही यासाठी खूप उत्सुक असल्याचं तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होता. दरम्यान, अनेकांनी केदारनाथचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावरुन साराच्या अभिनयाचं कौतुकही केलं आहे. तर बॉलीवूडमधील अनेकांनी साराला तिच्या पदार्पणासाठी शुभेच्छा आणि सोबतच अभिनयाचा काही टीप्सही दिल्या आहेत. साराची सावत्र आई करिना कपूर खाननेही साराच्या बॉलीवूड पदार्पणाविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान, करिना कपूरने साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यासोबतच मी कधीच सारा आणि इब्राहिमची आई होऊ शकत नाही, असं वक्तव्यही केलं. करिनाच्या या वक्तव्यामुळे बी-टाऊनमध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. याआधी अनेकदा सैफला पहिल्या पत्नीपासून झालेली  २ मुलं आणि करिना कपूर यांच्यातील नात्यांविषयी उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. अनेक ठिकाणी करिना तिच्या सावत्र मुलांसोबत एकत्रही दिसली आहे. मात्र, आता तिच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यातील नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

मी त्यांची आई होणं शक्य नाही

सारा अली खान नुकतीच कॉफी विथ करणाच्या एपिसोडमध्ये सैफसोबत गेली होती. त्यावेळी मी करिनाला छोटी माँ अशी हाक मारलेलं आवडणार नाही, असं ती म्हणाली होती. यालाच जोडून करिनाला एका मुलाखतीत तिच्या आणि सारामध्ये नेमकं काय नातं आहे, असं विचारलं गेलं. त्यावेळी उत्तर देताना करिना म्हणाली की, ‘मी सारा आणि इब्राहिमची एक चांगली मैत्रिण होऊ शकते. पण त्यांची आई कधीच होऊ शकत नाही. त्यांच्याकडे अमृतासारखी चांगली आई असल्यामुळे त्यांना दुसऱ्या आईची गरज नाही. मात्र, त्यांना कधीही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास, माझा आधार हवा असल्यास किंवा कोणत्या कामात सल्ला हवा असल्यास, मी नेहमीच त्यांच्यासाठी हजर असेन,’ असंही करिना यावेळी म्हणाली. मुलाखतीदरम्यान, मी आणि सारा चांगल्या मैत्रिणी असल्याचं सांगत करिनाने तिला तिचा आगामी चित्रपट केदारनाथसाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या.

‘केदारनाथ’ लवकरच…

केदानाथ या आपल्या पहिल्याच चित्रपटात सारा अली खानचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये सारा सुशांत सिंग राजपूतसोबत लिप लॉक करताना दिसत आहे. सुशांत सिंग राजपूतही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे. केदारनाथ चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रदर्शीत होणार असून त्याच्या प्रदर्शनावर अनेक वादविवाद यापूर्वी समोर आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -