घरमनोरंजनIndia’s Laughter Challenge : कपिल शर्माचा शो होणार बंद? तर सिद्धूचं 'या'...

India’s Laughter Challenge : कपिल शर्माचा शो होणार बंद? तर सिद्धूचं ‘या’ शोमधून कमबॅक

Subscribe

कॉमेडी किंग अभिनेता कपिल शर्मा याने कॉमेडी टेलिव्हिजन विश्वास आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कपिल शर्मा आपल्या हटके पंच लाईनने प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवतो. त्यामुळे कपिल शर्मा आज प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’चा टीआरपी घसरतोय. अशा परिस्थिती कपिलचा शो बंद होणार आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. यातच सोनी टीव्हीवर लवकरच ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ हा नवीन लाफ्टर शो सुरू होणार आहे. जो कपिल शर्माच्या शोची जागा घेणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, ‘इंडियाज लाफ्टर चॅलेंज’शी संबंधित एक प्रोमो व्हिडिओही निर्मात्यांनी जारी केला असून ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

शोचा घसरेला टीआरपी आणि कपिल आणि इतर कलाकारांचे बिझी शेड्युल यामुळे कपिल शर्मा शो बंद होणार असल्याचे म्हटले जातेय. नुकतचं सोनी टीव्हीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या नव्या शोचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. हा शो 26 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे म्हटले जातेय. या शोमध्ये देशातील कॉमेडियन सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

त्यामुळे कपिलचा शो ऑफ एयर होणार आहे. मात्र आतापर्यंत चॅनलकडून वेळ आणि तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’चा प्रोमो येताच नवज्योतसिंग सिद्धूच्या पुनरागमनाची अपेक्षा चाहत्यांना लागली आहे. या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “सिद्धू पाजी आने वाला है लगा है.” त्यानंतर आणखी एका यूजरने लिहिले, “द ग्रेट इंडियन लाफ्टर शो शेवटी परत आला आहे. सिद्धू पाजी परत आले आहेत.”

- Advertisement -

यापूर्वी देखील नवज्योत सिंग सिद्धू आणि अभिनेता शेखर सुमन यांचा असाच एका लाफ्टर शोमध्ये दिसले होते. ज्या शोचे नाव ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ असे होते. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या 5 यशस्वी सीझननंतर हा शो बंद करण्यात आला होता, पण आता जवळपास एक दशकानंतर हा शो पुनरागमन करत आहे. कदाचित नवज्योत सिंग सिद्धू या शोद्वारे पुनरागमन करू शकतात, असे बोलले जात आहे.


Video : ‘The Kashmir Files’ च्या यशानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी रिलीज केला ‘The Untold Kashmir Files’


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -