घरमनोरंजनजॅकी दादाची पत्नी आयशा श्रॉफ यांना 58 लाखांचा गंडा

जॅकी दादाची पत्नी आयशा श्रॉफ यांना 58 लाखांचा गंडा

Subscribe

आयशा श्रॉफ यांची 58 लाखांची फसवणूक झाली असून त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. आयशा श्रॉफ यांची 58 लाखांची फसवणूक झाली असून त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात एलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

आयशा यांनी या कलमांअंतर्गत केला गुन्हा दाखल

एएनआय या वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ट्वीट केले आहे. ज्यात सांगण्यात आलंय की, “जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ यांनी मुंबईच्या सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. एलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीविरोधात त्यांनी आयपीसी कलम 420, 408, 465, 467 आणि 468 च्या अंतर्गत 58 लाखाच्या फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु असून याबाबत आयशाकडून कोणतीही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.”

- Advertisement -

कशी झाली फसवणूक?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयशा श्रॉफ आणि त्यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफ हे एमएमए मॅट्रिक्स ही जीम चालवतात. 2018 मध्ये एलन फर्नांडिसला एमएमए मॅट्रिक्स कंपनीमध्ये डायरेक्टर ऑफ ऑपरेशंसची जबाबदारी देण्यात आली होती. आरोपीवर कंपनीच्या नावाखाली भारतामध्ये आणि भारताबाहेर 11 स्पर्धांचे नियोजन केले होते. त्याने या कार्यक्रमासाठी कंपनीतून मोठी रक्कम घेतली. स्पर्धेसाठी डिसेंबर 2018 ते जानेवारी 2023 पर्यंत कंपनीच्या खात्यातून 58 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली.

दरम्यान, आयशा श्रॉफने 1987 मध्ये जॅकी श्रॉफशी लग्न केले. दोघांना टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ ही दोन अपत्य आहेत. आयशा श्रॉफने 1984 मध्ये अभिनेता मोहनीश बहलसोबत ‘तेरी बहन में’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. यानंतर आयशा श्रॉफने अभिनय जगताला सोडचिठ्ठी दिली आणि निर्माती बनली.


हेही वाचा : श्लोका अन् आकाश अंबानींनी मुलीचं ठेवलं ‘हे’ सुंदर नाव; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -