घर महाराष्ट्र Shivsena एकनाथ शिंदेंनी नाही तर 'या' व्यक्तीने फोडली..; संजय राऊतांचा दावा

Shivsena एकनाथ शिंदेंनी नाही तर ‘या’ व्यक्तीने फोडली..; संजय राऊतांचा दावा

Subscribe

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यामुळे नाही तर भाजपच्या एका व्यक्तीमुळे शिवसेना फुटल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मागच्या वर्षी जून महिन्यापासूनच शिवसेना पक्षाला आणि उद्धव ठाकरे यांना बरेच धक्के मिळण्यास सुरूवात झाली होती. एकनाथ शिंदे यांनी 40 पक्षाचे आमदार आणि 10 अपक्ष आमदारांसोबत केलेल्या बंडखोरीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पाय उतार व्हावे लागले. ज्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेना पक्षात फुट पडल्याचे बोलले जाऊ लागले. परंतु आता संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यामुळे नाही तर भाजपच्या एका व्यक्तीमुळे शिवसेना फुटल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – NCP : राष्ट्रवादी काँग्रेसची 25 वर्षे; रौप्य महोत्सवी वर्षात पक्षाचे पदार्पण

- Advertisement -

संजय राऊत यांनी त्यांच्या आजच्या (ता. 10 जून) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही गोष्टींचा खुलासा केला आहे. तर शिवसेना पक्ष फुटीसाठी एकनाथ शिंदे नाही तर भाजपचे नेते अमित शाह कारणीभूत असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे शिवसेना फुटण्यासाठी इतक्या दिवसांपासून शिंदे यांच्या माथी फुटणारे खापर आता शाहांच्या माथी फुटण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्ष फोडून महाराष्ट्र कमजोर करणे, मुंबईवर मराठी माणसाची असणारी पकड ढिल्ली करणं हे भाजपचे अनेक वर्षांचे स्वप्न आहे. त्यामुळे शिवसेना फोडण्याचा डाव आखण्यात आला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 5-6 लोकांच्या माध्यमातून पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरु होता. पण शिंदेंची ताकद ही 5-6 आमदारांपेक्षा जास्त नसल्याने त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडण्यात आल्याचे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

शिवसेनेतून जे काही आमदार गेले त्यांच्यापैकी 12-13 आमदारांवर ईडी, सीबाआयचे खटले चालू होते. अनेक खासदारांवर खटले सुरु होते. या सर्वांचा वापर करून अमित शाहांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष फोडण्यात आला. कारण महाराष्ट्र कमजोर करणं, मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी, मुंबईवरचे मराठी माणसाचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, धमक्या, दहशत, पैसा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राजकारण असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपच्या या डावानंतर महाराष्ट्रातील गुंतवणूक, उद्योगधंदे बाहेर जाऊ लागले. पक्षाचा आवाज सर्वत्र कमजोर करण्याचे काम करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्यावरही ईडीच्या माध्यमातून दबाव आणण्यात आला. आमचं म्हणणं होत आपण खंबीर राहिले पाहिजे. पण हे लोक तेव्हा घाबरले. आता ते लोक गर्जना करत आहेत पण त्या पोकळ गर्जना आहेत. भविष्यामध्ये भाजपचं त्यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका देखील राऊतांनी शिवसेनेवर (शिंदे गट) केली आहे. तर 2014 मध्ये देखील भाजपने त्यांनी दिलेलं वचन निभावले नाही आणि त्यांनीच युती तोडली असे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

- Advertisment -