घरमनोरंजनNo Time To Die: जेम्स बॉन्डलाही करोनाची भिती

No Time To Die: जेम्स बॉन्डलाही करोनाची भिती

Subscribe

जगभरात दहशत पसरवणाऱ्या करोना व्हायरसचा धसका आता मोठ्या पडद्यावरच्या गुप्तचराने म्हणजेच जेम्स बाॅन्डनेही घेतला आहे. करोनाच्या भितीने त्याला आपल्या आगामी फिल्मची रिलीज डेट पुढे ढकलावी लागली आहे.

करोना व्हायरसने जगभरात दहशत पसरवली आहे. एकट्या चीनमध्ये या रोगाने ३००० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. भारतातही करोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. करोनावर मात करण्यासाठी सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. करोनाचा फटका जागतिक बाजारपेठेलाही लागल्याने जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण असून याचा फटका सिनेसृष्टीलाही लागला आहे.हॉलिवूडचा प्रसिद्ध अॅक्शन हिरो जेम्स बाॅन्डचा आगामी चित्रपट ‘No Time To Die’ पुढे ढकलावा लागला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट एप्रिल ऐवजी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार असल्याचे कळते. निर्मात्यांनी सांगितले कि, ब्रिटनमध्ये हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०२० ला, तर भारतासह जगात २५ नोव्हेंबर २०२० ला रिलीज होणार आहे.

सिनेमा बाजारपेठेचा अभ्यास करुन निर्णय

जेम्स बॉन्डने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहीले कि, ‘MGM, Universal and Bond producers आणि Michael G. Wilson and Barbara Broccoli या तीन मोठ्या निर्माता कंपन्यांनी बाजार आणि जागतिक सिनेमा बाजारपेठेचा अभ्यास करुन हा निर्णय घेतला आहे कि No Time To Die चित्रपट हा नोव्हेंबर २०२० पर्यंत टाळण्यात यावा.’

- Advertisement -

करोनाचा फटका इतर चित्रपटांनाही

हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज करण्यात येणार होता. मात्र आता हा चित्रपट एप्रिल ऐवजी नोव्हेंबरमध्ये रिलीज करण्यात येईल. करोना व्हायरसमुळे जागतिक सिनेसृष्टीवर विपरीत परिणाम होऊन सुमारे ५ बिलियन डॉलर्सवर प्रभाव पडू शकतो असे एका अहवालातून समोर आले आहे. इटली, दक्षिण कोरिया, चीन आणि जपान या देशांमधील चित्रपटगृह करोनाच्या प्रभावामुळे बंद आहे. याआधी करोनाचा फटका इतर चित्रपटांनाही लागला आहे. इटलीमध्ये चित्रीकरण होत असलेल्या ‘मिशन इंपाॅसिबल’ हा चित्रपटसुद्धा थांबवण्यात आला होता. त्यामुळेच करोनाच्या कचाट्यातून चित्रपटाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाथी जेम्स बॉन्डलाही आपला चित्रपट पुढे ढकलावा लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -