घरताज्या घडामोडीजॉन अब्राहमच्या 'Satyameva Jayate 2' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

जॉन अब्राहमच्या ‘Satyameva Jayate 2’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुचर्चित चित्रपट ‘सत्यमेव जयते २’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. चित्रपटात जॉन अब्राहमसोबत दिव्या खोसला कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लवकरच ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या ‘सत्यमेव जयते २’ ट्रेलरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

आज ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये जॉन अब्राहम जबरदस्त भूमिकेत दिसत असून दिव्या खोसला कुमार त्याची साथ देताना दिसत आहे. तसेच या चित्रपटातील आयटम साँगमध्ये आपल्या डान्स मुव्हने घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असून भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढताना जॉन दिसत आहे.

- Advertisement -

दीड वर्षाच्या चित्रपट प्रदर्शनाच्या विलंबानंतर अखेर ‘सत्यमेव जयते २’ची प्रदर्शनाची तारीख देखील ठरली आहे. ‘सत्यमेव जयते’ चित्रपटाचा ‘सत्यमेव जयते २’ हा सीक्वल आहे. ज्यामध्ये जॉन अब्राहम पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. चित्रपटात दिव्या शेतकऱ्यांसाठी पोलिसांसोबत संघर्ष करताना दिसत आहे. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पाहा जॉनच्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -