घरताज्या घडामोडीSatyameva Jayate 2: जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते २ ऑनलाईन लीक

Satyameva Jayate 2: जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते २ ऑनलाईन लीक

Subscribe

सत्यमेव जयते २ या सिनेमाने पहिल्याच दिवशी ३.६० करोड रुपयांचा गल्ला जमवला

जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार अभिनीत सत्यमेव जयते २ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतने वाट पाहत होते. सिनेमा २६ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होताच सिनेमाचे मोठे नुकसान झाले आहे. सत्यमेव जयते २सिनेमा रिलीज झाल्यानंतर ऑनलाईल लीक झाला आहे. अनेक साइट्सवर सिनेमा पायरसीचा शिकार झाला आहे. सिनेमाची एचडी प्रिंट पायरसी साइट्सवर लीक झाली आहे. या आधी देखील बेल बॉटम, सूर्यवंशी, बंटी और बबली२ हे सिनेमे देखील प्रेक्षकांच्या भेटीस आलेले सिनेमे देखील पायरेसीचे शिकार झाले आहेत.


सत्यमेव जयते २ या सिनेमाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. सत्यमेव जयते २ या सिनेमाने पहिल्याच दिवशी ३.६० करोड रुपयांचा गल्ला जमवला होता. हा सिनेमा ८ करोड रुपयांपर्यंत कमाई करेल असे म्हटले जात आहे मात्र सिनेमा ऑनलाईन लीक झाल्यामुळे सिनेमाची आता बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  दुसऱ्या दिवसी देखील सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळाला. सिनेमाचे रेटींग देखील वाढले होते.

- Advertisement -

सत्यमेव जयते२ हा सिनेमा मिलाप जावेरी यांनी दिग्दर्शित केला आहे. तर टी सीरीजने सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमात जॉन अब्राहम भ्रष्ट्राचारापासून देशाला दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. शुक्रवारी सलमान खानचा अंतिम हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला. अंतिमला देखील प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला. सत्यमेव जयते २ आणि अंतिम हे दोन्ही सिनेमा समोरा समोर आले दोन्ही सिनेमांमध्ये चांगलीच शर्यत पहायला मिळाली.

- Advertisement -

हेही वाचा – खुशखबर! १ डिसेंबरपासून पुण्यातील सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरू होणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -