घरक्रीडाIndonesia Open : पी व्ही सिंधूचा सेमी फायनलमध्ये पराभव

Indonesia Open : पी व्ही सिंधूचा सेमी फायनलमध्ये पराभव

Subscribe

इंडोनेशिया ओपन १०० टूर्नामेंटमध्ये भारतीय शटलर पी व्ही सिंधूचा शानदार प्रवास संपुष्टात आता आहे. सिंधुला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. थायलंडच्या माजी वर्ल्ड चॅम्पिअन रतचानोक इंथानोनने पी व्ही सिंधुला तीन सेटमध्ये पराभूत केले. आतापर्यंत दोन वेळा ऑलिम्पिक मेडल जिंकलेल्या पी व्ही सिंधुला २१-१५, ९-२१, १४-२१ अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला. जवळपास ५४ मिनिटे ही स्पर्धा चालली.
या स्पर्धेतील पहिला सेट पी व्ही सिंधूने २१-१५ ने जिंकला होता. पण त्यानंतरच्या दोन सलग सेटमध्ये सिंधूला पराभव स्विकारावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये रतचानोकने दमदार कमबॅक करत २१-९ ने हा सेट जिंकला. या सेटनंतर सामना बरोबरीचा झाला. त्यानंतर पुढचा सेटही जिंकत विजय आपल्या नावावर केला.

सलग तीन सामन्यात थाई प्लेअर्सकडून पराभव

पहिला सेट जिंकल्यानंतर पी व्ही सिंधूने सामन्यांत रंगत आणली होती. पण सलग दोन सेट जिंकत रतचानोकने सामन्यात विजय मिळवला. शेवटच्या सेटमध्ये २१-१४ असा विजय मिळवत हा सामना जिंकला. २६ वर्षीय पी व्ही सिंधू हा तिसरा सामना थाई खेळाडूंकडून हरली आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये ११ सामने झाले आहेत, त्यापैकी ७ सामन्यात रतचानोकने विजय मिळवला आहे. गेल्या ३ सामन्यात सिंधुला सलग तीन सामन्यात थायलंडच्या खेळाडूंकडून पराभव स्विकारावा लागला आहे.

- Advertisement -

सातत्याने शानदार खेळ सुरू

वर्ल्ड नंबर ७ पी व्ही सिंधु याच वर्षी ऑगस्टमध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. सिंधूने हे दुसरे ऑलिम्पिक मेडल जिंकले आहे. सिंधुने गेल्या काही महिन्यात सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. सिंधुने नुकत्याच झालेल्या इंडोनेशिया मास्टर्समध्ये आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या फ्रान्स ओपनच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवली होती. सिंधु तिसऱ्यांदा टूर्नामेंटच्या फायनलमध्ये पोहचली होती. पण तरीही फायनल जिंकू शकली नाही.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -