घरमनोरंजनसिंघम फेम काजल अग्रवाल झाली आई ; दिला गोंडस मुलाला जन्म

सिंघम फेम काजल अग्रवाल झाली आई ; दिला गोंडस मुलाला जन्म

Subscribe

आपल्या पतीसह काजल तिचा मदरहुड पीरियड एन्जॉय करणार आहे. गौतम आणि काजल आता आई-वडील झाले आहेत.

टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री काजल अग्रवाल  आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.  आपल्या पतीसह काजल तिचा मदरहुड पीरियड एन्जॉय करणार आहे. गौतम आणि काजल आता आई-वडील झाले आहेत.

काजलच्या घरी आला लहानगा पाहुणा
काजल अग्रवालने तिच्या प्रेग्नेंसीच्या काळात सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते. तिने तिचा प्रेग्नेंसी पीरियड खूप एन्जॉय केला. यावेळी तिने स्वताःला फिट ठेवण्यासाठी योगावर लक्ष दिलं. सोशल मीडियावर काजल अग्रवालला मुलगा झाल्याची बातमी कळताचं तिचे चाहते तिचं खूप अभिनंदन करत आहेत.

- Advertisement -

फेब्रुवारी महिन्यात काजलचे बेबी शॉवर झाले होते. याचे फोटो तिने सोशल मीडियीवर शेअर केले होते. यावेळी तिने गुलाबी रंगाची सुंदर बनारसी साडी नेसली होती. यासोबत तिने मॅचिंग ब्लाऊज आणि डिझायनर दागिणे सुद्धा घातले होते.

- Advertisement -

२०२० मध्ये झालं होत लग्न
काजल आणि गौतमचे लग्न ३० ओक्टोंबर २०२० मध्ये झालं होतं. यावेळी दोघांचे कुटुंबिय आणि नातेवाईक उपस्थित होते. काजल आणि गौतमची ओळख एका कॉमन फ्रेंड मार्फत झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू  मैत्रीने प्रेमाचं रूपांतर घेतलं. लॉकडाऊनच्या काळात दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर काजल अग्रवाल काही काळासाठी इंडस्ट्री पासून दूर झाली आहे. आता मुलाच्या जन्मानंतर ती तिचा पूर्ण वेळ मुलाला देणार आहे.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -