घरताज्या घडामोडीजावेद अख्तर प्रकरणातील निर्णयाला कंगनाचे आव्हान, सत्र न्यायालयात दाखल केली याचिका

जावेद अख्तर प्रकरणातील निर्णयाला कंगनाचे आव्हान, सत्र न्यायालयात दाखल केली याचिका

Subscribe

याचिकेवर 27 जानेवारी रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीधर भोसले यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

नोव्हेंबर 2020मध्ये गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात तक्रार दाखल केली. कंगना विरोधात गीतकार जावेद अख्तर ह्यानी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. मानहानी याचिका सदर प्रकरणाची सुनावणी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टा समोर न करता इतर कोर्टात स्थानांतरित करण्यात यावी यासाठी कंगनाने सत्र न्यायालयात धाव घेतली होती मात्र सत्र न्यायालयाने कंगनाची मागणी फेटाळली होती. त्यामुळे जावेद अख्तर प्रकरणात कंगनाने आता कोर्टाच्या ऑर्डरला आव्हान देत दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेऊन भारतीय दंड संहितेच्या कलम 408 अंतर्गत नवीन याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर 27 जानेवारी रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीधर भोसले यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

कंगनाने मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयतही धाव घेतली होती. मात्र तिथे तिच्या आरोप जामीनपात्रावर दखलपात्र करण्यायोग्य होते. या परिस्थितीची जाणीव असूनही अंधेरी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी आरआर खान यांनी खटला सुरू होण्याआधीच आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन कंगनाला दुखापत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2021मध्ये CMM न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर वकील रिजवान सिद्धीकी यांच्यामार्फत दिंडोशी सत्र न्यायालयात कंगनाने पुनरावृत्ती अर्ज दाखल केला होता.

- Advertisement -

जावेद अख्तर यांचे वकिल जय भारद्वाज यांनी काही तांत्रिक कारणे देत या या अर्जावर आक्षेप नोंदवला होता. अशाप्रकारे सत्र न्यायालयात पुनरावृत्ती अर्ज दाखल करणे ही योग्य कायदेशीर प्रक्रिया नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

 

- Advertisement -

हेही वाचा – प्रेम, कुटुंब काही आहे की नाही? अनुष्का-विराटच्या लग्नाविषयीच्या शोएबच्या कमेंटवर नेटकऱ्यांचा संताप

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -