घरमनोरंजनकंगनाच्या 'धाकड'मध्ये अर्जुननंतर दिव्या दत्ताची एंट्री; बघा लूक

कंगनाच्या ‘धाकड’मध्ये अर्जुननंतर दिव्या दत्ताची एंट्री; बघा लूक

Subscribe

हा चित्रपट १ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत तिच्या आगामी धाकड या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा चित्रपट १ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान अभिनेत्री दिव्या दत्ताचा लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात दिव्या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या पोस्टरमध्ये दिव्या साडीत दिसत असून दोन्ही हातात कडे आणि हाताला अलता लावलेला दिसतोय. दिव्या दत्ताचा हा लूक खतरनाक दिसतोय. दिव्याचा हा फर्स्ट लूक रिलीज झाल्यानंतर दिव्याने तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी तिने असे लिहिले की, हा लूक खूप खतरनाक आहे. मी धाकड चित्रपटातून नवी भूमिका साकारणार आहे. या भूमिकेचं नाव रोहिणी आहे. हा चित्रपट १ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

असा आहे कंगनाचा लूक

धाकड चित्रपटात कंगना मुख्य भूमिका साकारत असून या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात कंगना स्पेशल एजन्टची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेत्री दिव्या दत्ता हिचा लूक रिलीज होण्याआधी कंगनाचा धाकड लूक प्रदर्शित करण्यात आला होता. कंगनाच्या हातात तलवार दिसतेय, तर तिच्या चौफेर बाजूला रक्त सांडलेले दिसत असून मृतदेह देखील पडलेले दिसताय. यावरून असे स्पष्ट होते की, या चित्रपटात कंगनाची भूमिका नक्कीच दमदार असणार आहे.

- Advertisement -

कंगनाचा लूक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील अर्जुन रामपालचा लूक देखील समोर आला होता. या चित्रपटात अर्जुन देखील खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या पोस्टरमध्ये अर्जुन ब्लॅक लेदर जॅकेटमध्ये दिसत असून त्याच्या शरीरावर टॅटू काढलेलेही दिसतेय. चित्रपटातील अर्जुनचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर अर्जुनने त्याच्या हा लूक चाहत्यांसह शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)

दरम्यान, चित्रपट निर्मात्यांनी असा दावा केला की, धाकड हा चित्रपट असा अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून भारतीय चित्रपटाची वेगळी उंची गाठण्यास मदत करेल. भोपाळमध्ये कंगना सध्या तिच्या आगामी या धाकड चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन शूट करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -