घरमनोरंजनचित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कंगनाने केला 'हा' मोठा खुलासा

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कंगनाने केला ‘हा’ मोठा खुलासा

Subscribe

अभिनेत्री कंगना रनौत चा आगामी चित्रपट हा चर्चेचा विषय बनला असतानच कंगनाने एक वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी तिने चित्रपटात काम करत असताना कशा प्रकारचा त्रास झाला असल्याचे सांगितले.

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. कंगनाचा आगामी चित्रपट ‘मणिकर्णिका’ या महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान आपल्याला खूप मानसिक त्रास झाल्याचे तिने सांगितले आहे. बॉलिवूडमध्ये फक्त लैंगिक स्वरूपातच नाही तर मानसिक त्रासही दिला जातो, असे वक्तव्य तिने केले आहे. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान आपल्याला अनेक कलाकारांनी त्रास दिला असल्याचे कंगना म्हणाली. या पूर्वी कंगनाने अभिनेता हृतिक रोशनला टोमणा मारला होता. कंगनाचा आगामी चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

- Advertisement -

काय म्हणाली कंगना

“छळ विविध पद्धतीने केला जातो. छळ फक्त लैंगिक रित्याच होत नाही तर काही लोक आपल्या अहंकाराने ही दुसऱ्यांचा छळ करतात. मलाही अनेकदा यामुळे त्रास झाला आहे. हा छळ #metoo मोहीमेअंतर्गत येत नसला तरीही हा छळच आहे. मला अनेकदा चुकीची वेळ आणि जागा दिली जात होती. यामुळे मी सहा तास वाट बघितले आहे. काही कलाकारांनी शेवटच्या क्षणाला शुटिंग रद्द केली आहे. माझी थट्टा मसकरी केली जात होती. चित्रपटाच्या ट्रेलरवर हसून मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझ्या नकळत माझा आवाज डबिंग केला जात होता जे एका कलाकाराच्या मुलभूत हक्काचे उल्लंघन आहे.” – अभिनेत्री कंगना रनौत

 

View this post on Instagram

 

The Queen lights the diya that sparks the launch of #BharatYehRehnaChahiye music track from #Manikarnika

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -