घरमनोरंजन'ज्विगाटो'मध्ये कपिल शर्मा मुख्य भूमिकेत; डिलिव्हरी बॉयची साकारणार भूमिका

‘ज्विगाटो’मध्ये कपिल शर्मा मुख्य भूमिकेत; डिलिव्हरी बॉयची साकारणार भूमिका

Subscribe

'द कपिल शर्मा' या कार्यक्रमामध्ये सर्वांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा आता त्याच्या 'ज्विगाटो'मध्ये गंभीर भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कपिल सामान्य माणसाची भूमिका साकारताना दिसत आहे.

हिंदी टेलिव्हिजवर आपल्या विनोदाने खळखळून हसवणारा कॉमेडीयन कपिल शर्मा आता त्याच्या ‘ज्विगाटो’ या चित्रपटात झळकणार आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला होता. दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात असून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

कपिल शर्माचं गंभीर लूक प्रेक्षकांना भावलं
‘द कपिल शर्मा’ या कार्यक्रमामध्ये सर्वांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा आता त्याच्या ‘ज्विगाटो’मध्ये गंभीर भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कपिल सामान्य माणसाची भूमिका साकारताना दिसत आहे. कपिल शर्माच्या अभिनयाने लोकांना इंस्प्रेस केलं आहे.

- Advertisement -

लोकांनी केलं कौतुक

सोशल मीडियावर कपिलच्या ‘ज्विगाटो’ चित्रपटावर अनेक युजर्स कमेंट करत आहेत. यांपैकी एका युजरने लिहिलंय की, जर कलाकार राजकारणाशी बांधलेला नसेल, “तर त्याची कला अप्रासंगिक आहे. प्रत्येक कलाकाराला नंदिता दासपासून शिकवण घ्यायला हवी की, कशाप्रकारे एक प्रेरणेच्या रुपामध्ये आणि आपल्या प्रतिभेचा उपयोग आपल्यासारख्या लोकांना आवाज देण्यासाठी करा. ‘ज्विगाटो’साठी खूप उत्सुक आहेत.”

- Advertisement -

दुसऱ्या एका युजरने कपिल शर्माचं कौतुक करत लिहिलंय की, “कपिल शर्मा तुम्ही आम्हाला आश्चर्यचकित करण्यापासून कधीही चुकत नाही. हे सर्वोत्तम आहे. हा चित्रपट चांगला चालेल. मला तुमचा अभिमान आहे.”


हेही वाचा :

महेश टिळेकर दिग्दर्शित बहुचर्चित ‘हवाहवाई’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -