घरमनोरंजनकियारा-सिद्धार्थचा रिसेप्शनमधील डान्स व्हिडीओ व्हायरल

कियारा-सिद्धार्थचा रिसेप्शनमधील डान्स व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड मधील क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा 7 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, अशातच दिल्लीत त्यांच्या कुटुंबियांसोबत छोटेसे रिसेप्शन आयोजित केल्यानंतर, रविवारी मुंबईत देखील त्यांच्या बॉलिवूडमधील मित्रांसाठी मोठ्या धूमधडाक्यात एक भव्य रिसेप्शन आयोजित केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, आता कियारा-सिद्धार्थच्या रिसेप्शनमधील त्यांचा एक डान्स व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात सिद्धार्थ-कियारा आपल्या कुटुंबीयांसोबत बुर्ज खलीफा गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओच कौतुक करत आहेत.

- Advertisement -

बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी

रविवारी कियारा-सिद्धार्थच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात अभिनेत्री आलिया भट्ट, नीतू कपूर, अभिषेक बच्चन, विद्या बालन आणि तिचा पती, अजय देवगण, काजोल, रणवीर सिंह, वरुण धवन, दिशा पटानी यांसारखे अनेक कलाकार हजर होते. यांचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शाही थाटात पार पडला होता विवाह

राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. लग्रात कियाराने हलक्या गुलाबी रंगाची डिझायनर घागरा परिधान केला होता. सोबतच हिरव्या रंगाचा डायमन्ड हार घातला होता. तर सिद्धार्थने गोल्डन रंगाची एबरॉटी शेरवानी परिधान केली होती.

- Advertisement -

 


हेही वाचा :

Video : ‘व्हॅलेंटाईन डे’ला आकाश ठोसर ‘या’ अभिनेत्रीसह करणार रोमान्स, पाहा त्याचा नवा अंदाज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -