घरमनोरंजनभाग्यश्री म्हणतेय...'बस बुलेटवर'

भाग्यश्री म्हणतेय…’बस बुलेटवर’

Subscribe

‘खंडेराया झाली माझी दैना’, ‘सुरमई’, ‘आली फुलवली’ आणि आत्ता ‘बस बुलेटवर’ या आगामी रोमॅंटिक सॉंगने मराठी म्युझिक इंडस्ट्रीत चेतन गरुड प्रोडक्शन्सने धम्माल केली. सध्या सगळ्या तरूणांच्या ओठांवर केवळ हीच गाणी रेंगाळत असतात. तरुणांच्या मनातले भाव बिनधास्तपणे गाण्याच्या स्वरूपात मांडल्यामुळे हे गाणं गल्ली-नाका व्हाया कॉलेज कट्ट्यावर ऐकू येईल यात दुमत नाही. हे मस्तीभर गाणं लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहे. या गाण्याचा धमाकेदार टिझर तुम्हाला नक्की आवडेल. या गाण्यात एक तुमच्यासाठी एक सरप्राईझ आहे. ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ फेम आणि ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ या गाजलेल्या वेबसिरीजमधील भाग्यश्री आपल्या वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

चेतन गरुड आणि एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्ट यांच्या संयुक्तविद्यमाने ‘बस बुलेटवर… मला आवळून धर… घालूया प्रेमात कल्ला’ असे गमतीशीर शब्द असणाऱ्या या गाण्याची जादू तरुणाईला वेड लावेल अशीच आहे. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या प्रेमातला कल्ला सांगणारे हे गीत अक्षय कर्डक यांनी लिहिलं आहे. तर त्याला साजेसं संगीत अतुल भालचंद्र जोशी-सिद्धेश कुलकर्णी यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे गायक केवल जयवंत वाळंज यांनी आपल्या मस्तीभऱ्या गायकीने या गाण्यात खासच रंग भरलेत. तर

- Advertisement -

कसा आहे टीझर

बॉयफ्रें-गर्लफ्रेंडच्या भूमिकेत झळकणारे डॅक्स मॅथ्यू आणि भाग्यश्री एनएच यांनी ‘बस बुलेटवर’ गाण्यात एकच कल्ला उडवून दिलाय. या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे तेजस पाटील यांनी तर संकलन राहुल झेंडे यांनी केलं आहे. शिवाय प्रेमाची बार उडवून लावणाऱ्या या गाण्याची दिलखेचक सिनेमॅटोग्राफी रवी उच्चे यांनी केली आहे.  डॅक्स मॅथ्यू यांचं नृत्य-दिगदर्शन आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -