घरमनोरंजनOscar 2020: 'पॅरासाईट' चित्रपटाने पटकावला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

Oscar 2020: ‘पॅरासाईट’ चित्रपटाने पटकावला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

Subscribe

ऑस्कर हा चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झाली आहे. १९२९ साली सुरू झालेल्या या पुरस्काराचे हे ९२ वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वोत्कृष्ट कलाकार कोण? कुठला चित्रपट ऑस्कर जिंकतो याकडे सर्वांच लक्ष आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये ‘जोकर’ या चित्रपटाने सर्वाधिक नामांकनं पटकावली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा एकूण ११ विभागांमध्ये जोकरनं नामांकन मिळवली आहेत.

याशिवाय क्वेण्टिन टॅरॅण्टिनोचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’, मार्टिन स्कॉर्सेसीचा ‘द आयरिश मॅन’ आणि सॅम मेंडीसचा ‘१९१७’ या चित्रपटांना प्रत्येकी १० नामांकनं जाहीर झाली आहेत. तसेच दक्षिण कोरियातील ‘पॅरासाइट’ या चित्रपटाला सहा नामांकनं मिळाली आहेत. ‘पॅरासाइट’ हा चित्रपट यंदाचे खरे आकर्षण आहे. कारण इंग्रजी नसतानाही या चित्रपटाला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादित नामांकन मिळालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -