घरताज्या घडामोडीबिग बींचे 'मेहमूद' होते गॉडफादर, पण सुपरस्टार होताच विसरले उपकार

बिग बींचे ‘मेहमूद’ होते गॉडफादर, पण सुपरस्टार होताच विसरले उपकार

Subscribe

एकेकाळचे ज्येष्ठ विनोदी अभिनेते मेहमूद यांचा आज वाढदिवस. मुंबईत जन्माला आलेल्या मेहमूद यांनी बॉलिवूड मधे अनेक कलाकारांना मोठे केले. यात बिग बी अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. बिग बींचा कठीण काळात मेहमूद त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना अनेक चित्रपटात कामही मिळवून दिले. पण सुपरस्टार झाल्यानंतर बिग बी आणि मेहमूद यांच्या मैत्रीत अंतर आले ते कायमचे.

मेहमूद हे जेवढे विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते तेवढेच ते अडल्या नडल्यांना मदत करण्यासाठीही ओळखले जायचे.अनेक सहकारी त्यांच्याकडे मदत मागायला यायचे.बिग बी जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यानं राहण्यासाठी मेहमूद यांनी घरात जागा दिली होती. बॉलिवूड मधे काम कसे मिळवायचे पैसे कसे कमवायचे याचे धडेच मेहमूद यांनी बिग बिना दिले होते. बिग बी तेच फंडे वापरून काम करत होते. मेहमूद यांच्या ओळखीतून अनेक चित्रपट बिग बिना त्यावेळी मिळाले. यामुळे लोक बिग बिना ओळखू लागले.

- Advertisement -

बिग बीं चे नाव झाले. निर्माते त्यांच्या घराबाहेर रांगा लावून उभे राहत.मेहमूद यांनी सांगितलेले फंडे वापरून बिग बी मोठे झाले.पण नंतर त्यांच्यात आणि मेहमूद यांच्यात अंतर आले. अनेकवेळा मेहमूद बिग बींनी फोन करत पण बिग बी फोन उचलत नसत तर काहीेवेळा कामात असल्याचे सांगत फोन ठेवून देत..यामुळे मेहमूद दुखावले गेले.नंतर त्यांनी कधीही बिग बिंना भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केला नाही. बिग बी मात्र सुपरस्टार झाले..एकदा breach candy रुग्णालयात मेहमूद यांना अॅडमिट करण्यात आलं होतं.अनेक कलाकार निर्माते त्यांना भेटायला येत. अमिताभ आपल्याला भेटायला नक्की येतील असा विश्वास मेहमूद यांना होता.ते त्यांची वाट पाहत होते. पण अमिताभ रुग्णालयात त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या बरोबर स्वतःच्या कामासाठी आले पण मेहमूद यांना न भेटताच निघून गेले. यामुळे मेहमूद फार दुखावले गेले.

एका मुलाखतीत मेहमूद यांनी या किश्श्याबद्दल सांगितले. पण त्यानंतर मेहमूद यांची तब्येत खालावत गेली.श्वसनाच्या त्रासाने ते अनेकवेळा रुग्णालयात दाखल झाले. पण बिग बी त्यांना भेटण्यास कधीच गेले नाहीत.अखेर या महान कलाकाराने  23 जुलै २००४ रोजी अमेरिकेत जगाचा निरोप घेतला पण त्यावेळीही बिगी बी यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -