घरमनोरंजन'मिशन मंगल' चा ट्रेलर लाँच;चित्रपटाची उत्सुकता शिगेला !

‘मिशन मंगल’ चा ट्रेलर लाँच;चित्रपटाची उत्सुकता शिगेला !

Subscribe

अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०१३ मध्ये इस्रोकडून लाँच करण्यात आलेल्या मंगळयानावर आधारित आहे. मिशन मंगलचा हा दुसरा ट्रेलर लाँच होताच काही मिनिटांतच त्याला लाखो ह्यूज मिळाले आहेत.

अक्षय कुमारने आपल्या ट्विटरवर हा ट्रेलर शेअर केला आहे. ‘ सात वेळा खाली पडा…पण आठव्यांदा उठा! ही गोष्ट आहे कधी न हार मानन्याची’ अशा कॅप्शनसहीत त्यांनं हा ट्रेलर शेअर केला आहे. देशातील मिशन मंगल पूर्ण करणाऱ्या ऐत‍िहासिक घटनेवर हा चित्रपट आधारलेला आहे. यावेळी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये मंगळ मोहिमेतील टीममधील बॉण्डींग, मोहिमेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन दाखविण्यात आला आहे. त्यामुळे आता चित्रपटाविषयीची उत्कंठा आणखीनच वाढली आहे.

- Advertisement -

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) वर आधारित असून अक्षय कुमारनं यात एका वरिष्ठ वैज्ञानिकाची भूमिका साकारली आहे. रशिया, अमेरिका आणि युरोपियन देशानंतर मंगळावर पोहोचणारा भारत चौथा देश बनला आहे. चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्याव्यतिरिक्त या टीम तारा शिंदे (विद्या बालन), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), शर्मन जोशी (परमेश्वर नायडू), नेहा सिद्दिकी (कृति कुल्हारी) नजर हे कलाकार झळकणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -