घरमनोरंजनmrs world 2022 : भारताच्या नवदीप कौरने जिंकला 'बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्ड'; आऊटफिट...

mrs world 2022 : भारताच्या नवदीप कौरने जिंकला ‘बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्ड’; आऊटफिट पाहून सारेचं झाले थक्क

Subscribe

नवदीप कौरच्या लग्नाला 7 वर्षे झाली असून तिला 6 वर्षांची मुलगी आहे.

हरनाज संधू या सौंदर्यवतीने नुकताच मिस वर्ल्ड 2021 चा किताब जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. यानंतर आता लास वेगासमध्ये मिसेस वर्ल्ड 2022 सौंदर्य स्पर्धेचा सोहळा पार पडला. या स्पर्धेची विजेती ठरली अमेरिकेची शिलिन फोर्ड. मात्र भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नवदीप कौरनेही टॉप 15 मध्ये आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेत नवदीप कौरने बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्ड जिंकला आहे. (best national costume award)

नवदीपने हिने या स्पर्धेत ‘कुंडलिनी चक्र’ प्रेरित असलेला गोल्डन ड्रेस परिधान केला होता. जो पाहून सारेचं थक्क झाले. नवदीप कौरच्या ड्रेस हुबेहुब नागाच्या आकाराचा होता. या ड्रेसच्यावर अगदी नागाच्या फण्याच्या आकाराची टोपी आणि दात आहेत. ही टोपी तिच्या डोक्यावर दिसत होती. या ड्रेससोबत तिने नागाच्या आकाराचीच काटी आणि गोल्डन शूज परिधान केले होते. पूर्णपणे गोल्डन असलेल्या या ड्रेसवर हिऱ्यांनी सजावट करण्यात आली होती. नवदीपबद्दल एमआरएस इंडिया या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट करत लिहिण्यात आले की, ‘हृदय कृतज्ञतेने भरून आले. भारत आपण करुन दाखवले. हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे की, आमच्या क्वीनने मिसेस इंडिया वर्ल्ड 2021 मध्ये ‘बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्ड’ जिंकला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrs. India Inc (@mrsindiainc)

- Advertisement -

कोण आहे नवदीप कौर

नवदीप कौरने ‘मिसेस इंडिया 2021’चा किताब पटकावला होता. ती मूळची ओडिसामधील राउरकेला येथील रहिवासी आहे. नवदीप सुंदर तर आहेच पण ती खूप हुशारही आहे. तिने कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये (MBA) मास्टर्स केले. त्यानंतर ती एका बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून करत होती. याशिवाय तिने असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही काम केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Navdeep Kaur (@komal.navdeepkaur)

- Advertisement -

नवदीप 6 वर्षांच्या मुलीची आई

नवदीप कौरच्या लग्नाला 7 वर्षे झाली असून तिला 6 वर्षांची मुलगी आहे. नवदीपने सांगितले की, तिला फावल्या वेळेत मुलांना शिकवायला आवडते. मुलीच्या शिक्षणासाठी ती सतत प्रयत्नशील असते. ती लेडीज सर्कल इंडियाची गुडविल अॅम्बेसेडर आहे आणि तिने 1000 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.


Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -