घरताज्या घडामोडीBig Boss 15 : राखी सावंतवर भडकला सलमान खान ; म्हणाला, 'तू...

Big Boss 15 : राखी सावंतवर भडकला सलमान खान ; म्हणाला, ‘तू शोमध्ये…

Subscribe

अवघ्या दोन आठवड्यांवर बिग बॉस 15 चे फिनाले असणार आहे. अशातच घरातील सर्व सदस्यांचा फीनाले वीकमध्ये जाण्यासाठी सर्व खटाटोप सुरु आहे. याशिवाय चाहत्यांच्या मतासाठी या सदस्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण या शोमधील प्रत्येक आठवडाभराचा जो काही हिशेब आहे तो 'वीकेंड का वॉर'या शोमधून चुकता करावा लागतो. काल शनिवारी सलमान खान याने 'वीकेंड का वॉर' या भागात राखी सावंतची चांगलीच हजेरी घेतली.

बिग बॉस 15 यंदाचे सीजन मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्यातच आता बिचुकलेनंतर सलमान खान राखी सावंतवर भडकल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या दोन आठवड्यांवर बिग बॉस 15 चे फिनाले असणार आहे. अशातच घरातील सर्व सदस्यांचा फीनाले वीकमध्ये जाण्यासाठी सर्व खटाटोप सुरु आहे. याशिवाय चाहत्यांच्या मतासाठी या सदस्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण या शोमधील प्रत्येक आठवडाभराचा जो काही हिशेब आहे तो ‘वीकेंड का वॉर’ या शोमधून चुकता करावा लागतो. काल शनिवारी सलमान खान याने ‘वीकेंड का वॉर’ या भागात राखी सावंतची चांगलीच हजेरी घेतली.या ‘वीकेंड का वॉर’ या भागात सलमान खान याने तेजस्वी,प्रतीक सहजपाल आणि राखी अशा तिघांची हजेरी घेतली. मात्र राखीला तिच्या शोमधील काही क्लिप्स दाखवत सलमान खान तिच्यावर सर्वांपेक्षा जास्त भडकला. घरात होणाऱ्या सर्व गोष्टींची खबर बिग बॉस मेकर्सच्या आधी तुला माहीत असतात, असे म्हणत, सलमानने राखीला धारेवर धरले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

तेजस्वी जर फिनालेपर्यंत पोहचली तर, तुझ्या जिंकण्याची शक्यता कमी आहे,असं तू करणला कश्यावरुन म्हणाली? असे प्रश्न विचारत सलमान खानने राखीवर भडकायला सुरुवात केली. जेव्हापासून तू फिनालेमध्ये आली आहेस तेव्हापासून तुझ्याकडे काही करण्यासारख उरलंच नाही. त्यामुळे तुझ्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी तू हे सर्व शोमध्ये करत आहेस. खूप बोरिंग आहेस.जेव्हा तू या शोमध्ये आली तेव्हा एटंरटेनमेंट करत होती. मात्र.आता तू खूप कंटाळवाण्या पद्धतीचे वर्तन करत आहे, असे सलमान राखीला म्हणाला.

यंदाचा सीजन संपण्यासाठी केवळ दोन आठवडे राहिले असून, या सीजनला सुरुवात झाली तेव्हा या शोचा टीआरपी घसरला होता. मात्र टीआरपी वाढवण्यासाठी अनेक वाईल्ड कार्ड एन्ट्री बिग बॉसच्या घरात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Amitabh Bachchan : काम वाम बंद पण दाढी मात्र वाढतेय – बिग बी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -