घरमनोरंजनऋतिक रोशन मुंबई क्राईम ब्रांचची नोटीस, कंगना प्रकरण भोवण्याची शक्यता

ऋतिक रोशन मुंबई क्राईम ब्रांचची नोटीस, कंगना प्रकरण भोवण्याची शक्यता

Subscribe

मुंबई क्राईम ब्रांचकडून बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला कंगना प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसनंतर आता ऋतिक रोशनला शनिवारी जबाब नोंदवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययुकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. कंगना प्रकरणात तक्रार दाखल केल्याने ऋतिकला ही नोटीस आली आहे. (Mumbai Crime Branch) अभिनेता ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि अभिनेत्री कंगना रानौत एकमेकांचे चांगेल मित्र होते मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाले. हे वाद इतके टोकाला गेले की दोघांनी माध्यमांसमोरही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरु ठेवले होते. यानंतर ऋतिक आपल्याला इमेल पाठवत सतत त्रास देत असल्याचा आरोप कंगनाकडून करण्यात आला. मात्र ऋतिकने आपण कोणतेही इमेल पाठवत नसल्याचे सांगून आरोप फेटाळून लावले. हे सर्व प्रकरण २०१६ मध्ये घडले होते. याप्रकरणानंतर ऋतिकने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे कंगना विरोधात तक्रार दाखल केली. मात्र ही केस सायबर सेलने सीआययुकडे वर्ग केली. या तक्रारीला सीआययुकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पुन्हा या प्रकरणात वेगाने तपास सुरु झाला आहे. याचप्रकरणात ऋतिकला नोटीस पाठवून जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले आहे.

काय आहे दोघांमधला नेमका वाद

ऋतिक आणि कंगनाची मैत्री साऱ्या इंडस्ट्रीला माहित होती. दोघे एकमेकांसोबत नेहमी दिसायचे. मात्र तीन चार वर्षापूर्वी या मैत्रीत फूट पडली आणि दोघांनी एकमेकांशी बोलणं, भेटण बंद केल. मात्र याचदरम्यान कंगना जमेल त्या पद्धतीने ऋतिकवर आरोप करत होती. एक मुलाखलीमध्ये तिने ऋतिकविरोधात मनात असलेला राग बाहेर काढला. व ती माध्यमांसमोर ऋतिकला सिली एक्स असे म्हणाली. कंगनाने ऋतिकविरोधात आरोप करताना सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा- अग्गंबाई! बबड्याची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -