घरमनोरंजनअग्गंबाई! बबड्याची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता

अग्गंबाई! बबड्याची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

Subscribe

अग्गंबाई सूनबाईमध्ये शुभ्रा आणि सोहम म्हणजेच बबड्याच्या बदललेल्या भूमिका प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

अग्गंबाई सासूबाई ही प्रसिद्ध मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अल्पावधीतच मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. मालिकेला प्रचंड यश मिळाले. मात्र ही मालिकेची जागा आता ‘अग्गंबाई सूनबाई’ ही मालिका घेणार आहे. अग्गंबाई सूनबाई ही मालिका अग्गंबाई सासूबाई या मालिकेचा दुसरा भाग असणार आहे. अभिजित आणि आसावरी यांच्या भूमिका अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते गिरीश ओक साकारणार आहे. तर शुभ्राची व्यक्तिरेखा ही अभिनेत्री उमा पेंढारकर साकारणार आहे. मात्र मालिकेतील सर्वांचा लाडक्या बबड्याची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यामुळे अग्गंबाई सूनबाईमध्ये शुभ्रा आणि सोहम म्हणजेच बबड्याच्या बदललेल्या भूमिका प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

मालिकेचा पहिला प्रोमोही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात आसावरी, अभिजीत आणि नव्या शुभ्राची दमदार एट्री दाखवण्यात आली. मात्र सोहम कुठेय हा प्रश्न सर्वच प्रेक्षकांना पडला होता. सोहमची भूमिका अभिनेता ‘अद्वैत दादरकर’ साकारताना दिसणार आहे. त्यामुळे सोहम म्हणजेच आशुतोष पत्कीची बबड्याची भूमिका अद्वैत दादरकर साकारणार आहे. अद्वैत माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत सौमित्रच्या भूमिकेत दिसला होता. मात्र आता सौमित्र बबड्याची भूमिका कशी पार पाडतो हे पाहणे प्रेक्षकांसाठीही औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisement -

मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या सहज अभिनयाने आसावरीने साकारलेली सोज्वळ आई असो, शेफच्या भूमिकेतील अभिजीत राजे तर खाष्ट पण प्रेमळ आजोबा आणि त्याचा आगावू, लाडावलेला नातू बबड्या म्हणजेच सोहम आणि त्याची प्रॅक्टिकल, सुंदर बायको शुभ्रा या सर्वच कलाकारांनी मालिकेत वेगळीच मज्जा आणली. मात्र आता नवीन सोहम आणि शुभ्रा मालिकेत काय मजा आणणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.


हेही वाचा – अग्गंबाई सूनबाईमध्ये कोण आहे नवीन शुभ्रा? जाणून घ्या

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -