घरमनोरंजनसरोगसी प्रकरणी नयनतारा आणि विघ्नेशला क्लीनचीट

सरोगसी प्रकरणी नयनतारा आणि विघ्नेशला क्लीनचीट

Subscribe

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे स्टार नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या सरोगसी प्रकरणी तामिळनाडू सरकारची चौकशी पूर्ण झाली आहे. दोघांनी कोणताही कायदा मोडला नसल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे सरोगसी प्रकरणातून नयनतारा आणि विघ्नेशला क्लीनचीट मिळाली आहे. नयनतारा आणि विघ्नेश यांनी ऑक्टोबर महिन्यात सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. यूइर आणि उलगम असं या मुलांची नावं आहेत.

नयनतारा आणि विघ्नेशने लग्नानंतर अवघ्या पाचव्या महिन्यात जुळ्या मुलं झाल्याची बातमी शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी अनेकांनी तिच्या प्रेग्नंसीवर आक्षेप घेतला. यावेळी सरकारला यात हस्तक्षेप करावा लागला, कारण भारतात जानेवारीपासून कमर्शियल सरोगसीवर बंदी आहे. अशी परिस्थितीत लग्नानंतर नयनतारा आणि विघ्नेशने इतक्या लवकर मुलाच्या जन्माचा निर्णय का घेतला असेल असा प्रश्न उपस्थित झाला. यामुळे नयनताराच्या प्रेग्नेंसीला काही स्तरातून विरोध झाला. यावेळी राज्य सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला.

- Advertisement -

यासाठी तामिळनाडू सरकारने आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. नयनतारा- विघ्नेशच्या सरोगसी तपासणीत समितीला आढळून आले की, या स्टार जोडप्याने कोणताही कायदा मोडला नाही. तसेच सरोगसीसाठी त्यांनी कोणत्याही चुकीचे समर्थन केले नाही. मात्र या अहवालात ज्या रुग्णालयाने ही तपासणी केली त्यांच्यावर ठपका ठेवला आहे.

तपासादरम्यान असेही आढळून आले की, नयनतारा आणि विघ्नेशच्या फॅमिली डॉक्टरमुळे हे सर्व चुकीचे झाले आहे. डॉक्टरांनी 2020 मध्ये शिफारस पत्र दिले होते, ज्याच्या आधारे हे उपचार केले गेले. फॅमिली डॉक्टरशी बोलणे शक्य नाही कारण ते आता भारताबाहेर दुसऱ्या देशात स्थायिक झाले आहेत.

- Advertisement -

अहवालानुसार, सरोगेट आईने नोव्हेंबर 2021 मध्ये या जोडप्यासोबत करार केला होता. त्याच वेळी मार्च 2022 मध्ये आई बनण्याची प्रक्रिया सुरू झाली. यानंतर ऑक्टोबरमध्ये नयनतारा आणि विघ्नेश यांच्या जुळ्या मुलांचा जन्म झाला. डिसेंबर 2021 मध्ये सरोगसी कायदा मंजूर झाल्यानंतर जानेवारीमध्ये भारतात व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती. या टाइमलाइननुसार नयनतारा आणि विघ्नेश यांनी ही सरोगसी प्रक्रिया कायदेशीर असताना केले.

समितीने संबंधित हॉस्पीटलवर रेकॉर्ड पूर्णपणे न ठेवल्याचा ठपका ठेवत दोषारोप दाखल केले. संबंधित हॉस्पीटलमुळे सर्व गोंधळ उडाल्याने याप्रकरणी विभागाने हॉस्पीटलला कायदेशीर नोटीसही बजावली आहे.

नयनतारा आणि विघ्नेश शिवन या वर्षी जूनमध्ये एका प्रायव्हेट सेरेमनीत विवाहबद्ध झाले. पण या प्रायव्हेट सेरेमनीत अनेक बड्या स्टार्सनी उत्साहाने भाग घेतला. रजनीकांत, शाहरुख खान, विजय सेतुपती, एआर रहमान, सुरिया, अनिरुद्ध यांसारखे मोठे स्टार्स लग्नात दोघांना आशीर्वाद देताना दिसले. नयनतारा लवकरच शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटात दिसणार आहे.


एसटीच्या ताफ्यात दाखल होणार 4000 नव्या गाड्या; बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -