घरक्राइमVideo : बॉलिवूड निर्मात्याने पत्नीला कारखाली चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद

Video : बॉलिवूड निर्मात्याने पत्नीला कारखाली चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद

Subscribe

मुंबई – बॉलिवूड चित्रपट निर्माता किशोर मिश्रा यांने पत्नीसोबत वाद झाल्याने तिला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पार्किंग विभागात झालेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा – सरोगसी प्रकरणी नयनतारा आणि विघ्नेशला क्लीनचीट

- Advertisement -

अंधेरीतील एका इमारतीतील पार्किंगमध्ये कमल मिश्रा यांच्या कारमध्ये एक महिला बसली होती. कमल मिश्रा यांच्या पत्नीने ती कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कमल यांनी पत्नीच्या दिशेने गाडी चालवली. त्यामुळे त्या खाली कोसळल्या. १९ ऑक्टोबर रोजी घडलेली ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, याप्रकरणी कमल मिश्रा यांच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, अंबोली पोलीस ठाण्यात एफआआर दाखल करण्यात आला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -