घरमनोरंजननीरजच्या चित्रपटांत अजय चाणक्य

नीरजच्या चित्रपटांत अजय चाणक्य

Subscribe

वेगळे आणि उत्तम कथा पटकथा असलेले सिनेमे बनवण्यात नावाजलेले दिग्दर्शक नीरज पांडे अजय देवगणला घेऊन लवकरच एक चित्रपट करणार आहेत. वेनस्डे, स्पेशल २६ आणि बेबी सारखे वेगळ्या विषयाचे चित्रपट बनवल्यावर नीरज नवा प्रोजेक्ट हाती घेणार आहेत. लवकरच नीरज चाणक्य नावाचा चित्रपटाचे काम सुरू करणार आहेत. यात त्यांनी अजय देवगणला घेतलं आहे. चाणक्य हे इतिहासातील महत्वाचं व्यक्तीमत्व आहे. यात चाणक्यची मुख्य भूमिका अजय देवगण करणार आहे. डिसेंबरमध्ये चित्रपटाचे शूटींग सुरू होणार आहे. तर पुढच्या वर्षी चित्रपट रिलिज होणार आहे. चित्रपट आजच्या काळातील आहे. यातील कथानकातीही प्रमुख व्यक्तीरेखा राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरू न अडचणीत सापडल्यावर त्याच्या मदतीला चाणक्य येतो. असं काहीसं हे कथानक आहे. लगे रहो मुन्नाभाईमध्ये ज्या प्रकारे महात्मा गांधीजी नायकाच्या मदतीसाठी येतात, तसाचा हा प्रकार आहे. दुसरीकडे अजय देवगणही नीरज पाडेंसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. या चित्रपटात अजय देवगणचा डबल रोल आहे. एक व्यक्तीरेखा चाणक्यची आहे तर दुसरी चित्रपटाच्या नायकाची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -