घरमनोरंजन'मोगली : दि लेजेंड ऑफ जंगल'चा हिंदी ट्रेलर रिलीज

‘मोगली : दि लेजेंड ऑफ जंगल’चा हिंदी ट्रेलर रिलीज

Subscribe

नेटफ्लिक्सवरील आगामी चित्रपट 'मोगली : दि लेजेंड ऑफ जंगल'चा हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

नेटफ्लिक्सवरील आगामी चित्रपट ‘मोगली : दि लेजेंड ऑफ जंगल’चा हिंदी ट्रेलर रविवारी रिलीज करण्यात आला असून यामुळे चित्रपटाची उत्सुकता खुपच वाढली आहे. या चित्रपटाला एंडी सर्किस यांनी दिग्दर्शीत केले आहे. रुडयार्ड किपलिंग यांनी दि जंगल बुक या पुस्तकावर आधारीत चित्रपटाची कथा लिहिली आहे. १९ व्या शतकातील मोगली नावाच्या मुलाची ही गोष्ट आहे. हा मुलगा जंगलातील प्राण्यांमध्ये वाढला आहे. काही दिवसांपूर्वी याचा इंग्रजी ट्रेलर प्रदर्शीत झाल होता.

वाचा : पुन्हा एकदा येणार मोगली

- Advertisement -

वाचा : यावेळी माणसांशी होणार ‘मोगली’चा सामना

- Advertisement -

व्हिज्युअल्स आणि अॅनिमेशनने नटलेला

या चित्रपटाचा महत्त्वाचा गाभा आहे म्हणजे त्याचे व्हिज्युअल्स आणि अॅनिमेशन. यामुळे चित्रपटाला एक भव्यदिव्य रुप प्राप्त झाला आहे. मागच्या चित्रपटाप्रमाणेच बघीरा आणि बल्लू यामध्ये मोगलीची साथ देताना दिसणार आहेत. याशिवाय शेरखान मोगलीचा दुश्मनच असणार आहे. मात्र, यावेळी चित्रपटात अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच ही कथा नक्की काय आहे याचा अंदाज येणार आहे. याआधी २०१६ मध्ये आलेल्या ‘दि जंगल बुक’मध्ये मोगलीच्या लहानपणाची गोष्ट दाखवण्यात आली होती. मोगली जंगलातील एक भाग कसा बनतो आणि बघीरा आणि बल्लू त्याचे कसे मित्र बनतात, त्याशिवाय शेरखान कसा त्याचा दुश्मन होतो आणि बदला घेतो याभोवती ती कथा होती. यापुढे आता पुढील चित्रपटात नक्की काय घडणार हे पाहणे मनोरंजनात्मक असणार आहे.

वाचा : डार्क नाइट्सचा बॅटमॅन बनला बघीरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -