घरताज्या घडामोडीप्रेक्षकांना हसवण्यासाठी लवकरच येतोय ‘कॉमेडी बिमेडी’ नवा शो

प्रेक्षकांना हसवण्यासाठी लवकरच येतोय ‘कॉमेडी बिमेडी’ नवा शो

Subscribe

दरवर्षी दिवाळीत रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी आणि खमंग फराळ हा बेत ठरलेला असतो. आनंदाची बरसात करणाऱ्या या सणाची आपण वर्षभर वाट पाहात असतो. यंदा प्रेक्षकांची दिवाळी आणखी खास करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन येतय नवा कार्यक्रम ‘कॉमेडी बिमेडी’शो. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निखळ हास्याचे क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. कॉमेडी बिमेडी कार्यक्रमाद्वारे हेच हरवलेले मजेशीर क्षण पुन्हा वेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १५ नोव्हेंबरपासून ‘कॉमेडी बिमेडी’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाक्षेत्रात नावाजलेले १६ विनोदवीर आपल्या अफलातून स्टाईलने प्रेक्षकांना हास्याचा मनमुराद आनंद देतील. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणत्याही स्वरुपाची स्पर्धा नसेल त्यामुळे शोमध्ये परीक्षण नाही आणि परीक्षण नसल्यामुळे इथे परीक्षकही नाहीत. विनोदवीरांच्या जोड्या धमाल विनोदी स्कीटचं सादरीकरण करतील. त्यामुळे १ तास प्रेक्षकांचं फक्त आणि फक्त मनोरंजन होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सूत्रसंचालकही नसेल. त्यामुळे विनोदवीरच थेट प्रेक्षकांशी संवाद साधतील.

- Advertisement -

आशिष पवार, दिगंबर नाईक, अतुल तोडणकर, मंगेश देसाई, किशोरी अंबिये, आरती सोळंकी, संतोष पवार, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, परी तेलंग, प्राजक्ता हनमघर, शेखर फडके, बालाजी सुळ, देवयानी मोरे, शर्वरी लहादे आणि पूर्णिमा अहिरे ही कलाकार मंडळी आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतील. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागासाठी निर्मिती सावंत, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, सुप्रिया पाठारे, विकास समुद्रे, विजय पटवर्धन, अतुल आणि सोनिया परचुरे हे खास गेस्ट असणार आहेत. तर पहिल्या भागाचं सूत्रसंचालन मकरंद अनासपुरे आणि कविता लाड-मेढेकर करणार आहेत. ‘कॉमेडी बिमेडी’ १५ नोव्हेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा – टायगरच्या ‘हिरोपंती २’मध्ये तारा सुतारियाची एंट्री

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -