घरमनोरंजन'फिल्मफेअर असताना ऑस्करची गरज काय?'

‘फिल्मफेअर असताना ऑस्करची गरज काय?’

Subscribe

केआरके सोशलमिडीयावर त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नेहमीप्रमाणेच गली बॉयची ऑस्करला निवड होताच केआरकेने वादग्रस्त ट्वीट केलं आहे.

अभिनेता रणवीर सिंग, आलिया भट यांची मुख्य भुमिका असणारा ‘गली बॉय’ ची निवड ऑस्कर पुरस्कारासाठी करण्यात आली. ऑस्करच्या बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म या विभागासाठी गली बॉयची निवड करण्यात आली. गली बॉय चित्रपटाच्या टीमवर सगळीकडून कौतूकाचा वर्षाव होत आहे. मात्र बॉलिवूडची एक व्यक्ती यामुळे नाराज झाली आहे. हा चित्रपट ऑस्कर जिंकूच शकत नाही अस विधान या व्यक्तीने केलं आहे. ही व्यक्ती म्हणजे बॉलिवूडचा समिक्षक कमाल आर खान.

 केआरके सोशलमिडीयावर त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नेहमीप्रमाणेच गली बॉयची ऑस्करला निवड होताच केआरकेने वादग्रस्त ट्वीट केलं आहे. तो म्हणतो, गली बॉय हा एक चांगला चित्रपट आहे. पण हा चित्रपट अनेक हॉलिवूडच्या चित्रपटांची कॉपी आहे. याचाच अर्थ संदाही भारत ऑस्कर जिंकू शकत नाही. मुळात आपण ऑस्कर जिंकण्याचे प्रयत्न करू नयेत. फिल्मफेअर सारखा पुरस्कार असताना आपल्याला ऑस्करची गरज काय? अस ट्वीट त्याने केलं आहे.

- Advertisement -

‘गली बॉय’सह ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, ‘केसरी’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’ आणि ‘अंधाधून’ आदी चित्रपट ऑस्करवारीच्या स्पर्धेत होते. मात्र या सर्व सिनेमांवर गली बॉयने मात केली आहे. गेल्या वर्षी भारताने ऑस्करसाठी ‘व्हिलेज रॉकस्टार’ची निवड केली होती.

झोया अख्तरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या आधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गली बॉयला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय दक्षिण कोरियातील २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाचा पुरस्कारही गली बॉयला मिळाला होता. धारावीतील एका स्लम रॅपर्सच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. यापूर्वी झोया अख्तरने ‘लक बाय चान्स’, ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ आणि ‘दिल धडकने दो’ आदी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील अभिनयामुळे रणवीर आणि आलीय यांच्यावर कौतुकाचा मोठा वर्षाव झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -