घरमनोरंजननाटक 'अडगळ' होणे अशक्य; दिग्गजांचे विचारमंथन

नाटक ‘अडगळ’ होणे अशक्य; दिग्गजांचे विचारमंथन

Subscribe
शनिवारी ९९ व्या अखिल भारतीय मराठीनाट्यसंम्मेलनाच्या पूर्वार्धात  ‘नाटक – जगण्याची समृद्ध अडगळ’ या विषयावर परिसंवाद अयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहभागी होत अध्यक्ष शफाद खान, वामन केंद्रे, अतुल पेठे, आशुतोष सरपोतदार आणि विभावरी देशपांडे आदी मान्यवरांनी या विषयावरील आपले विचार मांडले.
‘नाटकप्रेमींनी आणि नाट्यकर्मींनी एकत्र येऊन नाटकावर चर्चा कारण्यासाठी , विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी वारंवार असे परिसंवाद व्हायला पाहिजेत’, असे मत परिसंवादाचे अध्यक्ष शफाद खान यांनी व्यक्त केले. खान म्हणाले की, नाटककला टिकवण्यासाठी , वाढवण्यासाठी प्रेक्षक आणि नाटककार दोघांनीही पुढाकार घ्यायला हवा.
काळासोबत नाटक बदलतंय, मराठी नाटक ओळख हरवून बसलंय असं बोललं जातंय. या गोष्टींचा नाटक निर्माते, दिगदर्शक आणि कलाकार सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला आणि आवश्यक ती सुधारणा केली तर नाटक भविष्यात अडगळ होणार नाही
..……….……….
माळ्यावर ठेवलेली पण उपयोगाची असलेली ,  हवीहवीशी वाटणारी आणि त्यामुळे माळ्यावरून पुन्हा घरात स्थिरावणारी अडगळ अशी आज नाटकाची आज अवस्था आहे. आपल्या सर्वांना गरज आहे ती नाटकाची अफाट आणि अभिजात परंपरा समजून घेण्याची. कारण परंपरा समजली, उमगली कीच त्यामध्ये काळानुरूप नाविन्यता, नवे बदल आणता येतात. नाटकाला पुरुतजीवीत करणं निर्मात्यांच्या आणि तितकंच प्रेक्षकांच्या हातात आहे.
नाटकात गांभीर्याने नवनवे प्रयोग करू इच्छिणाऱ्यांना हरप्रकारे प्रोत्साहित केले तर ही कला कायम वाढत जाईल, आणि हवीहवीशी अडगळ बनेल  – अतुल पेठे
 
नातकाची व्यापक व्याप्ती समजलो तरंच ते जपणं आणि वाढवणं सोप्पं होईल. आज मालिका, डिजिटल मीडिया च्या जंजाळात नाटकाचा अधिक तीव्रतेने प्रचार, प्रसार करण्यची गरज आहे.  बरेचसे नाटक निर्माते नाटकाचं मूळ शास्त्र विसरले आहेत. शास्त्र शिका तरच शास्त्र जोपासना शक्य होईल  – आशुतोष सरपोतदार 
ग्रिप्स थिएटरच्या मध्यमातून आम्ही लहान मुलांमध्ये नाटकच बीज रुजवतो. लहान पिढीमध्ये नाटकाची आवड निर्माण केल्यास तेच पुढे हा नाट्य कलेचा वारसा यशस्वीपणे घेऊन जाऊ शकतील. ज्यांना मनापासून आवड आहे अशा लहान मुलांना नाटकाचे धडे घेण्यासाठी पालकांनी कृपया प्रोत्साहित करा. हीच मुलं नाटकाचं भविष्य आहेत ।- विभावरी देशपांडे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -