घरमनोरंजन'पीएम नरेंद्र मोदीं'च्या बायोपिकचे प्रदर्शन ढकलले पुढे

‘पीएम नरेंद्र मोदीं’च्या बायोपिकचे प्रदर्शन ढकलले पुढे

Subscribe

८ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शन संदर्भातील याचिकेची सुनावणी होणार असल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होणार नसल्याचे चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी सांगितले आहे. तसेच, प्रदर्शनाची पुढील तारिख कोणती असेल हे देखील अद्याप स्पष्ट केले नाही. या संदर्भातील माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

दिल्ली, मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पण, हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शना संदर्भातील याचिकेच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार झाले असून, ८ एप्रिल रोजी यावरील याचिकेची सुनावणी होणार असल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे, असे निर्माता संदीप सिंह यांनी ट्विटवरून सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -