घरमुंबईवाढत्या तापमानात पक्षांच्या दाणा-पाण्याची सोय

वाढत्या तापमानात पक्षांच्या दाणा-पाण्याची सोय

Subscribe

सोहम फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन उल्हासनगर शहर परिसरात ही मोहीम सूरु केली आहे.

उल्हासनगरच्या सोहम फाउंडेशन या सामाजिक संस्थेने टाकाऊ वस्तूंपासून पक्षांच्या दाणा-पाण्यासाठी भांडी बनवली आहेत. शहरातील विविध ठिकाणी झाडांवर या भांड्यांमध्ये पक्षांसाठी पाण्याची तसेच दाण्यांची सोय या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. या उपक्रमाचे शहरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. वाढत्या तापमानाचा फटका मानवाबरोबरच पक्षांना सुद्धा जाणवू लागला आहे. पाण्यावाचून अनेक पक्षी दगावतात ही बाब लक्षात घेऊन उल्हासनगरच्या सोहम फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देठे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी पुढाकार घेत हा उपक्रम सुरु केला आहे.

नागरिकांचा प्रतिसाद

या संस्थेने “एक घास पक्ष्यांसाठी “हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. घरातील टाकाऊ वस्तूंपासून पक्षांसाठी दाणा आणि पाणी यांचे भांडे बनविले जाते आणि ते शहरातील विविध ठिकाणी लावले जाते. उल्हासनगरचा शहाड फाटक परिसर आणि सेंच्युरी रेयॉन, गोल मैदान आदी परिसरात 36 ठिकाणी पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. सोहम फाउंडेशनचे सदस्य जातीने या ठिकाणी लक्ष देतात. आता तर स्वयंस्फूर्तीने नागरिक देखील या उपक्रमात सहभागी होत आहेत.

- Advertisement -

ग्लोबलायझेशनचा फटका पक्षांना

या संदर्भात माहिती देतांना सोहम फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र देठे म्हणाले की 20 मार्च हा जागतिक स्पॅरो डे ( चिमणी ) दिवस म्हणून साजरा केला जातो . ग्लोबलायझेशनचा सर्वाधिक फटका हा पक्षांना झाला आहे, त्यातल्या त्यात चिमण्यांवर याचा परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने चिमण्या दगावतात आणि हे प्रमाण इतके वाढत चालले आहे की चिमण्या आता दुर्मिळ पक्षी म्हणून गणले जात आहेत. त्यामुळे चिमण्या आणि इतर पक्षांची दाणा-पाण्याची सोय व्हावी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत .

सेंच्युरी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणारे नारायण वाघ हे देखील सोहम संस्थेमध्ये काम करतात, ते म्हणाले की एकदा मी ड्यूटीवर होतो त्यावेळी झाडाखाली कोकिळा तळमळत पडली, मी तिला पाणी घेण्यासाठी गेलो आणि परत आलो मात्र त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. हा प्रसंग माझ्या मनावर कायम कोरला गेला आहे. तेव्हापासून या उपक्रमात मी सहभागी झालो आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -