घरमनोरंजनLockDown: अजय देवगणच्या घरी पोहोचला त्याचा बॉडीगार्ड; व्हिडीओ पाहून मोदींनी केले कौतुक!

LockDown: अजय देवगणच्या घरी पोहोचला त्याचा बॉडीगार्ड; व्हिडीओ पाहून मोदींनी केले कौतुक!

Subscribe

कोरोनाविरूद्धच्या लढाईत प्रत्येक भारतीयाला पर्सनल बॉडीगार्ड दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्वांचेच जीवन थांबले आहे. असे असताना मात्र बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला लॉकडाऊनदरम्यान त्याचा पर्सनल बॉडीगार्ड भेटला असून त्याचे नाव सेतू आहे. त्याने आपल्या या नव्या बॉडीगार्डचा एक मजेदार व्हिडीओ देखील शेअऱ केला आहे. अजय देवगणने शेअर केलेल्या या व्हिडीओचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे कौतुकही केले आहे.

अजय देवगणच्या या व्हिडिओमध्ये स्वत: चा बॉडीगार्ड म्हणून वर्णन करणारी व्यक्ती स्वत: अजय देवगणशिवाय इतर कोणी नाही. दरम्यान, सगळीकडे आरोग्य सेतू अॅपची चर्चा सुरू आहे, संपूर्ण १३० कोटी लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करून हे अॅप सरकारने तयार केली आहे. हे सरकारी अॅप लोकांना कोरोना व्हायरसचा धोका आणि संसर्गाच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यास मदत करते. अजयने शेअर केलेल्या या व्हिडीओद्वारे लोकांना या भयावह रोगासाठी किती उपयुक्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जो आपल्या स्वतः सह आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करते.

- Advertisement -

हा व्हिडीओ शेअर करताना अजय देवगणने लिहिले की, कोरोनाविरूद्धच्या लढाईत प्रत्येक भारतीयाला स्वत: चा पर्सनल बॉडीगार्ड दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. यासह सेतू माझा बॉडीगार्ड आहे आणि तुमचाही… त्यामुळे तुम्हीही आरोग्य सेतू अॅप. (Setu Aarogya) डाऊनलोड करा. हा व्हिडीओ शेअर करताना अजय देवगणने अमिताभ बच्चन, सलमान खान, काजोल, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांनाही टॅग केले आहे.

- Advertisement -

अजय देवगणचा हा व्हिडीओ पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्यांचे कौतुक करण्यास स्वत: ला रोखू शकले नाहीत. त्यांनी ट्विटद्वारे असे म्हटले की, ‘अप्रतिम अजय देवगण. आरोग्य सेतू आपल्याला सुरक्षित ठेवते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आणि देशाचे कोरोनापासून संरक्षण करते’ यासह कोरोनाविरूद्धचा हा लढा आणखी मजबूत करण्यासाठी त्यांनी आरोग्य सेतू हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहनही केले आहे.


‘आरोग्य सेतू’ ठरले १३ दिवसांत ५ कोटी लोकांनी डाऊनलोड केलेले जगातील पहिले App
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -