घरमनोरंजनrohan shrestha सोबतच्या ब्रेकअपदरम्यान Shraddha Kapoor ला चाहत्यांनी विचारले असे प्रश्न

rohan shrestha सोबतच्या ब्रेकअपदरम्यान Shraddha Kapoor ला चाहत्यांनी विचारले असे प्रश्न

Subscribe

खरंतर श्रद्धा कपूर सोशल मिडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या सुंदर पोस्ट्सने चाहत्यांना घायाळ करते. अलीकडेच, ब्रेकअप दरम्यान, तिने तिचा एक अतिशय सुंदर सेल्फी असलेली एक पोस्ट शेअर केली, जी आता चर्चेत आहे.

श्रद्धा कपूरने तिचा फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासोबतच्या प्रेमसंबंधाचे सत्य कधीच उघड केले नव्हते. लोकांनी त्यांच्या या मैत्रीच्या नात्याला प्रेम म्हटले होते आणि त्यांच्या या प्रकरणाला लोकांनी लग्नापर्यंत नेले होते. सूत्रांच्या माहितीनुसार आता श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठाच्या नात्यामध्ये ४ वर्षानंतर अंतर निर्माण झाले आहे. रोहन श्रेष्ठासोबतच्या ब्रेकअपदरम्यान श्रद्धा कपूरने सोशल मिडियावर तिच्या सेल्फीची एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याच्या कमेंट बॉक्समध्ये लोक तिला तिच्या ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारून खरं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

खरं तर श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या सुंदर पोस्ट्सने चाहत्यांना घायाळ करते.
अलीकडेच ब्रेकअपदरम्यान तिने तिचा एक अतिशय सुंदर सेल्फी असलेली एक पोस्ट शेअर केली, जी आता चर्चेत आहे.

- Advertisement -

बिना मेकअपचा फोटो शेअर

श्रद्धा कपूर ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बिना मेकअपचा फोटो शेअर केला. या फोटोला शेअर करत तिने खाली एक कॅप्शन सुद्धा दिलं, ज्यामध्ये तिने ‘अजून ऐकवा….?’ असं लिहिलं.

- Advertisement -

चाहत्यांनी विचारले प्रश्न
श्रद्धा कपूरच्या या पोस्टनंतर तिचे चाहते तिला अनेक प्रश्न विचारत आहेत. चाहते विचारत आहेत की, रोहन श्रेष्ठासोबतच्या ब्रेकअपचे खरे सत्य काय आहे? एका यूजरने लिहिले,’आमचे सगळे ठीक, तुमचे सांगा’ दुसऱ्याने लिहिले, ‘तुझं ब्रेकअप झालं आहे का?’ तर अजून एकाने लिहिलं- ‘तुम्हीच सांगा बातमीत किती तथ्य आहे’.

ब्रेकअपच्या बातमीवर तिची अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पिंकविलाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, श्रद्धा आणि रोहन गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये वेगळे झाले आहेत. रोहन श्रेष्ठाने श्रद्धा कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली नसल्याचीही बातमी समोर येत आहे. 3 मार्च रोजी श्रद्धा कपूरने तिचा वाढदिवस गोव्यात साजरा केला होता आणि तिथून परतताना ती विमानतळावर एकटी दिसली होती.


हेही वाचा : मॅनेजरला अपशब्द वापरल्याने सोनाक्षी सिन्हाच्या अडचणीत वाढ; मानहानीचा खटला दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -