घरताज्या घडामोडीDance Deewane 3च्या सेटवर लहान मुलीची चेष्टा करणं राघव जुयालला पडलं महाग;...

Dance Deewane 3च्या सेटवर लहान मुलीची चेष्टा करणं राघव जुयालला पडलं महाग; ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी

Subscribe

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात काहीही सहजपणे बोलणं सोप्पं नाही. आता मनोरंजनासाठी केलेल्या वक्तव्याचे रुपांतर कधी वादात होईल हे काही सांगू शकतं नाही. असं काहीसं हिंदी रिअॅलिटी शो ‘डान्स दीवाने ३’चा सूत्रसंचालक राघव जुयाल याच्यासोबत घडलं आहे. राघवने आसामहून आलेली स्पर्धक गुंजन सिन्हाला स्टेजवर बोलण्यापूर्वी तिची ओळख ज्या अंदाजात केली, त्याने कंट्रोव्हर्सी निर्माण झाली. राघव यामुळे ट्रोलर्सच्या जाळ्यात अडकला आहे. एवढंच नाहीतर आसामचे मुख्यमंत्र्यांनी देखील यावर आपलं मतं मांडलं आहे. त्यामुळे हा वाद चिघळल्यानंतर राघव जुयालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि स्पष्टीकरण दिलं आहे.

नक्की काय घडलं?

‘डान्स दीवाने ३’मधील एका एपिसोडमधील राघवची सध्या एक छोटीशी व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये तो गुंजन सिन्हाची ओळख करून देताना असे शब्द वापरत आहे, जे वर्णद्वेषीसोबत जोडले जात आहेत. तो व्हिडिओ काय आहे ते पाहा…

- Advertisement -

राघवाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागितली आहे. राघव म्हणाला की, लोकांनी एवढ्या मोठ्या एका एपिसोडमधून एक छोटासा व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल केला. मला वर्णद्वेषी म्हणून बोलावलं जात आहे आणि याचा मला मानसिक त्रास होत आहे. ईशान्य भारतात माझे कुटुंब आणि मित्रही आहेत. ईशान्य भारतात राहणाऱ्या लोकांचा मी फक्त आदर करतो असं नाही तर मी त्यांच्यासोबत त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी उभा देखील राहतो. दरम्यान गुंजनने क्रिएटिव्हला सांगितलं होतं की, ती चायनीज बोलू शकते, परंतु त्याचे उच्चार खूप अस्पष्ट होते. तिच्याकडे हे टॅलेंट होते. संपूर्ण शोमध्ये ती हसत-खेळत ही भाषा खास शैलीत बोलत असे. त्यामुळे शोच्या शेवटी तिच्या अंदाजात स्टेजवर आमंत्रित करेल असं मी ठरवलं होत. हे फक्त मनोरंजनासाठी होतं. पण एका छोट्याच्या क्लिपहून मला जज करणं चुकीचं आहे. मात्र यामुळे लोकांच्या भावना दुखावल्यामुळे माफी मागतो, हे जाणूनबुजून केलं नाही. तसंच ट्रोल करत असलेल्या युजर्सनी संपूर्ण शो पाहा. ज्यामुळे गुंजनसोबत कसं माझं बाँड आहे आणि त्या चेष्टेमागे काय हेतू होता हे समजेल. पाहा राघवचा व्हिडिओ…

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

- Advertisement -


हेही वाचा – दिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या नातेवाईकांचा अपघात; ६ जणांचा मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -