घरताज्या घडामोडीVideo Viral: The Kashmir Files पाहिल्यानंतर ढसाढसा रडू लागली राखी सावंत

Video Viral: The Kashmir Files पाहिल्यानंतर ढसाढसा रडू लागली राखी सावंत

Subscribe

देशभरात सध्या ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतरचे प्रेक्षक भावूक झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. काश्मिर घाटीतील काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांचे पलायन यावर आधारित असलेला ‘द काश्मिर फाईल्स’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. १०० कोटींपेक्षा अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपट पाहून बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत ढसाढसा रडत चित्रपटगृहाबाहेर आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंतने तिच्या आईसोबत ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपट पाहिला. चित्रपट पाहण्यासाठी जात असताना राखी खूप खुश होती. व्हिलचेअरवर आईला घेऊन राखी चित्रपट पाहण्यासाठी आली होती. यादरम्यान तिने पापराझींना पोझ देखील दिली. पण चित्रपट पाहिल्यानंतर राखी भावूक होऊन चित्रपटगृहाबाहेर आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

सुरुवातीला बोलत असताना राखी खूप नॉर्मल होती. हसत हसत बोलत होती. परंतु जेव्हा तिने चित्रपटाबाबत बोलण्यास सुरुवात केले, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. ती म्हणाली की, ‘मी हसत हसत चित्रपट पाहायला गेली आणि रडत रडत बाहेर आली. पण सत्य बाहेर आले, हे चांगले झाले.’ यावेळी राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. राखीच्या या भावूक व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.


हेही वाचा – The Kashmir Filesच्या वादावर नाना पाटेकर म्हणाले, ‘समाजात फूट पाडणे ठीक नाही’


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -