घरमनोरंजनराखी सावंतला आदिवासी वेशभूषेची चेष्टा करण पडलं महाग, पोलिसात तक्रार दाखल

राखी सावंतला आदिवासी वेशभूषेची चेष्टा करण पडलं महाग, पोलिसात तक्रार दाखल

Subscribe

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत तिच्या हटके, अतरंगी स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. मात्र ही अतरंगी स्टाईलच तिला आता भारी पडली आहे. राखी सावंतविरोधात रांची येथील एसटी-एससी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय सरना समितीने हा गुन्हा नोंदवला आहे. राखी सावंतने बेली डान्स ड्रेसचे वर्णन आदिवासी ड्रेस असल्याचे केले होते. यातून राखी सावंतने आदिवासींचा पेहराव असल्याचे सांगत अश्लीलतेची परिसीमा ओलांडल्याचे समितीचे म्हणणे आहे. राखी सावंतचे नवीन गाणे ‘मेरे वरवा’ रिलीज होणार आहे. या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान राखी सावंतने परिधान केलेल्या तिच्या ड्रेसचे वर्णन तिने ‘आदिवासी आऊटफिट’ असे केले होते. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या ड्रेसची तुलना आदिवासी लूकशी करताना दिसतेय. या लूकमुळे राखी सावंतही ट्रोलच्या निशाण्यावर आली होती.

राखी सावंतला एन्टरटेन्मेंट क्वीन म्हटले जाते. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. ती सोशल मीडिया पोस्टद्वारेही त्यांचे मनोरंजन करताना दिसते, परंतु अनेक वेळा राखी तिच्या फॅशन सेन्सने मर्यादा ओलांडताना दिसते. नुकताच राखी सावंतने असा आउटफिट कॅरी केला होता, ज्याला पाहून चाहत्यांना हसू रोखणे कठीण झाले.

- Advertisement -

राखी सावंत न्यूड कलरच्या मल्टी-लेयर्ड मिनी स्कर्ट, स्टोन स्टडेड बिकिनी टॉप आणि डोक्यावर फेदर्सने भरलेला जड मुकुट परिधान केला होता. या लूकमध्ये डान्स करताना ती म्हणाली की, हा माझा ‘आदिवासी लूक’ आहे. यानंतर ट्रोल्सनी सतत कमेंट करत राखी सावंतची खिल्ली उडवायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, राखी सावंत उर्फी जावेदची पूर्वज आहे आणि आता ते स्पष्ट झाले आहे. तर आणखी एका यूजरने लिहिले की, आलियाच्या लग्नात हिला आदिवासी नृत्यासाठी बोलावण्यात आले आहे… हुबा हुबा बाबूसा.

यापूर्वी राखी सावंत रणवीर सिंगसोबत रेड कार्पेटवर डान्स केल्यामुळे चर्चेत आली होती. एका इव्हेंटमध्ये राखी असे कपडे घालून पोहोचली होती की, तिला तिचा स्कर्ट पुन्हा पुन्हा फिक्स करावा लागला. राखी सावंतचा आमिर खानसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. राखी सावंत नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोलच्या निशाण्यावर असते.


आमिर खानने घेतला मुलासोबत आंब्यांचा आस्वाद

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -