घरमनोरंजनअयोध्येचा ऋषी सिंह ठरला 'इंडियन आयडल 13' चा विजेता

अयोध्येचा ऋषी सिंह ठरला ‘इंडियन आयडल 13’ चा विजेता

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘इंडियल आयडल 13’ च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या ऋषी सिंह या शोचा विजेता ठरला आहे. रविवारी रात्री म्हणजे 2 एप्रिल 2023 रोजी ‘इंडियन आयडल 13’चा ग्रँड फिनाले होता. फिनालेमध्ये 6 फायनलिस्ट होते ज्यात ऋषी सि, शिवम सिंह, बिदिप्ता चक्रवर्ती, चिराग कोतवाल, देबोस्मिता रॉय आणि सोनाक्षीकर हे स्पर्धक होते.

‘इंडियन आयडल 13’ चा विजेता

ऋषी सिंह ‘इंडियन आयडल 13’ मध्ये त्याच्या अप्रतिम आवाजासाठी ओळखला जात होता. त्याच्या कोणत्याही गाण्यात प्रत्येकजण हरवून जायचा. ऋषीच्या गाण्याचे अनेक चाहते होते. त्यामुळे 5 तगड्या स्पर्धकांना मागे टाकत ऋषीने
‘इंडियन आयडल 13’ चा विजेता होण्याचा मान पटकावला. ऋषीला 25 लाख रुपयांचे बक्षीस रक्कम आणि ट्रॉफीसह एक चमकणारी कार मिळाली आहे. तसेच देबिस्मिता आणि चिराग प्रथम आणि द्वितीय उपविजेते ठरले, ज्यांना ट्रॉफीसह 5 लाख रुपयांचा धनादेश मिळाला आहे.

- Advertisement -

मंदिरात गायचा ऋषी सिंह

ऋषीला लहानपणापासूनच गाणं गाण्याची आवड होती. ‘इंडियन आयडल 13’ चा विजेता ठरलेला ऋषी सिंह हा अयोध्येचा रहिवासी असून तो या शोमध्ये येण्यापूर्वी मंदिर आणि गुरुद्वारांमध्ये गाणं गायचा.

 

- Advertisement -

हेही वाचा :

अजय देवगणच्या ‘भोला’ची प्रेक्षकांना भुरळ; 50 कोटींचा टप्पा पार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -