घरदेश-विदेश'या' प्रकरणात नेहरूंनीही मागितली होती माफी; अनुराग ठाकूर यांनी केला दावा

‘या’ प्रकरणात नेहरूंनीही मागितली होती माफी; अनुराग ठाकूर यांनी केला दावा

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी (२ एप्रिल) एका कार्यक्रमात राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे आणि गांधी कोणाची माफी मागत नाहीत असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला पकडून अनुराग ठाकूर यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी तुरुंगातील त्रासामुळे सुटका होण्यासाठी माफीनामा लिहिल्याचा दावा केला आहे.

राहुल गांधी यांना ‘मोदी आडनावा’शी संबंधित टिप्पणी केल्याबद्दल 4 वर्ष प्रलंबित मानहानीच्या गुन्ह्यात सुरतच्या जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे दोन दिवसानंतर राहुल गांधींना लोकसभेसाठी अपात्र ठरवत त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे आणि गांधी कोणाची माफी मागत नाहीत असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला पकडून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, राहुल गांधी कधीही सावरकर होऊ शकत नाहीत, यासाठी त्यांना तुरुंगात अपार त्याग आणि कष्ट सहन करावे लागतील.

- Advertisement -

ठाकूर राहुल गांधींना उद्देशून म्हणाले की, “तुम्ही जर एखाद्याचा आदर करू शकत नसाल तर किमान त्यांचा अपमान तरी करू नका. ठाकूर यांनी यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान आणि राहुल यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंजाबमधील जालियनवाला बाग हत्याकांडानंतर झालेल्या आंदोलनासाठी अटक झाली होती. यावेळी त्यांनी नाभा तुरुंगात होत असलेल्या त्रासांमुळे “माफीनामा” लिहिल्याचा दावा केला आहे. याशिवाय ठाकूर असेही म्हणाले की, नेहरूंनी यापुढे कोणत्याही आंदोलनात भाग घेणार नाही आणि या भागात परतणार नाही असेही लिहून दिले होते. नाभा कारागृहातील एका फलकानुसार नेहरू, के. संथानम आणि ए.टी. गिडवाणी यांना २२ सप्टेंबर १९२३ रोजी नाभा संस्थानात प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती, असेही ठाकूर यांनी सांगितले.

राहुल गांधींच्या ‘कधीही माफी मागणार नाही’ या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधींनी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात ‘चौकीदार चोर है’ या टिप्पणीबद्दल माफी मागितली असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -