घरमनोरंजन'सावट' चित्रपटाचा चित्तथरारक टिझर प्रदर्शित

‘सावट’ चित्रपटाचा चित्तथरारक टिझर प्रदर्शित

Subscribe

'सावट' कथेचा चित्तथरारक टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून टिझरमध्ये दर्शवलेल्या संदेशावरून नक्कीच यात गूढ, थरारक आणि रंजक कथानकाचा अंदाज येतो.

बहुचर्चित सावट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची तारीख निश्चित झाली असून येत्या २२ मार्च या चित्रपटाचे रहस्य उलगडणार आहे. या सावट कथेचा चित्तथरारक टिझर नुकताच सोशल मीडियावर लाँच झाला असून या टिझरमधून थरारक सिनेमा पाहताना एक प्रकाराची रक्त गोठवणारी भीती नसानसातून सळसळणार आहे.

काय आहे टीझरमध्ये…

एका गावात सात वर्षात सात आत्महत्या होतात आणि या सगळ्या आत्महत्या श्रावण महिन्यातच होतात. विशेष म्हणजे त्यातल्या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे. या प्रत्येकानेच कोणाला तरी पाहिलंय.कोणाला?.. हितेशा देशपांडे, शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट या चित्रपटाचा पहिला टिझर पाहून कोणाच्याही मनात प्रश्नांचे डोंगर उभे राहतील. टिझरमध्ये दर्शवलेल्या संदेशावरून नक्कीच यात गूढ, थरारक आणि रंजक कथानकाचा अंदाज येतो, असे या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.

- Advertisement -

“मराठीत एक म्हण आहे, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तसंच काहीसं सावट सिनेमाबाबतही आहे.. सत्य-असत्याच्या रेषेवरचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांचे सावटचं ब-याचदा माणसाच्या मनावर असते. आणि मग तो उगीच घाबरून श्रध्दा-अंधश्रध्देच्या कचाट्यात सापडतो.  – हितेशा देशपांडे, ‘सावट’ चित्रपटाच्या निर्मात्या

“हा चित्रपट थरारनाट्य आहे. एका गावात काही समजुती आणि गैरसमजुतींचं सावट लोकांच्या मनावर असताना, चित्रपटात आत्महत्यांच सत्र चालू होतं. चित्रपट गुढकथेवर आहे. यातली प्रत्येक पात्र तुम्हांला खिळवून ठेवतील, असा मला विश्वास आहे.”  – सौरभ सिन्हा, दिग्दर्शक

- Advertisement -


वाचा – २२ मार्चला उलगडणार ‘सावट’ चित्रपटाचे रहस्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -