घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआमदाराचा जाच; पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा

आमदाराचा जाच; पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा

Subscribe

ऑडिओ क्लिप व्हायरल, पारनेरच्या लोकप्रतिनिधीची सर्वदूर चर्चा

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात त्यांनी आमदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा इशारा दिलाय. या प्रकारामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये तहसीलदार देवरे यांनी प्रत्यक्ष लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरीही त्यांचा संपूर्ण रोख हा आमदार निलेश लंके यांच्यावर आहे. त्यांनी दिलेली काही उदाहरणंदेखील थेट लंकेंशी संबंधित आहेत. या प्रकारामुळे प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वितुष्ट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. ज्योती देवरेंनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दीपाली चव्हाण यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. मी लवकरच तुझ्या सोबत येत आहे, असे सांगत एका महिलेचा प्रशासनात कसा छळ होतो, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमदार लंके यांनी लसीकरणावरुन एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. याचा उल्लेखही देवरे यांनी नामोल्लेख न करता केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -