घरमनोरंजनसलमान खानने शेअर केला 'किसी का भाई किसी की जान'मधील लूक

सलमान खानने शेअर केला ‘किसी का भाई किसी की जान’मधील लूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 2022 मध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट 2023 मधील ईद दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर दिवाळीमध्ये सलमानचा ‘टायगर 3’ चित्रपट प्रदर्शित होईल. दरम्यान, नुकतंच सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. सलमानच्या या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सलमान खानने शेअर केला ‘किसी का भाई किसी की जान’मधील लूक

- Advertisement -

सलमान खानने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरु ‘किसी का भाई किसी की जान’त्याच्या फर्स्ट लूक शेअर केला असून त्याने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच या फोटोमध्ये त्याने ब्लॅक कलरचे डेनिम आणि टी-शर्टसोबत मल्टीकलरचे जॅकेट घातले आहे.

‘किसी का भाई किसी की जान’मध्ये असणार हे कलाकार
या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले असून या चित्रपटामध्ये सलमान सोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्घार्थ निगम, जस्सी गिल आणि राघव जुयाल दिसून येतील. तसेच व्यंकटेश आणि जगतपति बाबू देखील महत्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. दरम्यान, या चित्रपटाव्यतिरिक्त सलमान ‘टायगर 3’, ‘किक 2’, ‘नो एंट्री 2’, ‘बजरंगी भाईजान 2’ मध्ये देखील दिसून येईल. तसेच तो शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटामध्ये देखील कॅमियो करताना दिसेल.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘या’ कारणामुळे नीना गुप्ता यांनी ‘वध’ चित्रपट करण्यास दिला होकार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -